Engineering Career Opportunities: अभियांत्रिकी क्षेत्रात संधींचे नवे विश्व; एआय, रोबोटिक्स, ई-वाहनांसह नव्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी

कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंत्यांची जागा घेणार नाही, तर त्यांच्या कौशल्याला नवी शक्ती देणार; तज्ज्ञांचे मत
Engineering
EngineeringPudhari
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे: तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्र एका नव्या पर्वात प्रवेश करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डीप लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, ॲटोमेशन, व्हर्च्युअल रिॲलिटी, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, ई-वाहनांचे तंत्रज्ञान, रिन्युएबल एनर्जी आदी शाखांचा अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने उदय झाला आहे.

Engineering
Pune Anant Chaturdashi Rain: अनंत चतुर्दशीला पुण्यात जोरदार पावसाची शक्यता; विसर्जन मिरवणुकीवर जलाभिषेकाची शक्यता

त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात संधींचे नवे विश्वच निर्माण झाल्याचे मत अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंत्यांची जागा घेणार नाही. उलट अभियंत्यांच्या ज्ञानाला, कल्पकतेला आणि कार्यक्षमतेला नवी शक्ती देणार आहे. त्यामुळे भविष्यातील अभियांत्रिकी हे मानव आणि तंत्रज्ञान यांच्या प्रभावी सहकार्याचे क्षेत्र ठरणार आहे.

Engineering
Belbag Chowk Traffic: गणेशभक्तांना पूर्व भागात जाण्यास बंदी नाही; बेलबाग चौकातील वाहतूक नियोजनावरून मंडळांचा आक्षेप

मशिन लर्निंग, डीप लर्निंगमुळे संगणकीय प्रणाली उपलब्ध माहितीचा अभ्यास करून त्यातून उपयुक्त निष्कर्ष काढू शकतात. त्यामुळे औद्योगिक यंत्रांची पूर्वदेखभाल, गुणवत्ता नियंत्रण, वैद्यकीय निदान, ऊर्जा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा शक्य होत आहे. यामुळे अभियंत्यांसमोर केवळ रोजगाराच्या नव्या संधीच नव्हे, तर संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञाननिर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Engineering
Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात तब्बल ४ लाख ७८ हजार प्रवाशांचा प्रवास

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळणार

भविष्यात अभियांत्रिकी शिक्षण अधिक अनुभवाधारित, प्रयोगशील आणि प्रत्यक्ष समस्यांशी जोडलेले असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला नवी दिशा मिळणार आहे. डिजिटल व्यवस्थेचा विस्तार होत असल्याने कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. त्यामुळे संगणकीय सुरक्षा, माहिती सुरक्षा, जाल सुरक्षा आणि डिजिटल तपासणी या क्षेत्रांमध्ये नवीन अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. रोबोटिक्स आणि स्वयंचलितीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. धोकादायक, अत्यंत अचूक किंवा सातत्याने करावी लागणारी कामे स्वयंचलित यंत्रणांच्या माध्यमातून केली जात आहेत. यामुळे मानवी क्षमतेची जागा घेण्याऐवजी मानवी कौशल्याला अधिक महत्त्वाच्या कामांसाठी मुक्त करण्याची संधी निर्माण झाली आहे. यातूनच संशोधन, रचना, नियोजन, नवोन्मेष आणि निर्णय प्रक्रियेत अभियंत्यांची भूमिका अधिक महत्त्वाची होत आहे.

ऊर्जेची वाढती गरज आणि पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेता विद्युत वाहने, सौरऊर्जा, पवनऊर्जा, ऊर्जासाठवण आणि हरित तंत्रज्ञानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रांमध्ये विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी, संगणक आणि इतर शाखांतील अभियंत्यांसाठी संशोधन, उत्पादन, रचना आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.

Engineering
Ranjhe Sagar Palve Case: रांझेतील सागर पालवे खूनप्रकरणी तिघांना अटक; विधीसंघर्षीत बालक ताब्यात

तंत्रज्ञानातील बदलांकडे संधी म्हणून पाहण्याची गरज

तंत्रज्ञानातील बदलांकडे आव्हान म्हणून पाहण्याऐवजी संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामागे नवीन कौशल्यांची, नवीन उद्योगांची आणि नवीन रोजगारांची निर्मिती होत असते. संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रांनी ज्या मोठ्या संधी निर्माण केल्या, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, विद्युत वाहने, अक्षय ऊर्जा आणि संगणकीय सुरक्षा ही क्षेत्रे भविष्यात रोजगाराचे नवे केंद्र बनतील. त्यामुळे भविष्यातील अभियंत्यांना एका शाखेपुरते मर्यादित न राहता तांत्रिक ज्ञानाबरोबरच माहितीचे विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय विचार, संवादकौशल्य, नेतृत्व, संघभावना आणि उद्योजकता आदी गुण आत्मसात करावे लागणार असल्याचे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करून नवनवीन शाखांमुळे अभियांत्रिकी क्षेत्रात संधीचे जे नवे विश्व निर्माण झाले आहे, त्या संधींचा फायदा घेत करिअर घडविण्याबरोबरच देश घडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रा. उद्धव शिद, संचालक, झील एज्युकेशन सोसायटी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news