Pune Startup: पुण्यात ‘Synnovation 2026’चा भव्य सोहळा; स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि उद्योजक एकाच मंचावर

Synnovation 2026 Investors Startups Event: पुण्यातील Synnovation 2026 या कार्यक्रमात स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार एकत्र आले. 26 स्टार्टअप्सनी आपली उत्पादने सादर केली, तर 16 गुंतवणूकदारांनी रस दाखवला.
Synnovation 2026 Investors Startups Event
Synnovation 2026 Investors Startups EventPudhari
Published on
Updated on

Synnovation 2026 Investors Startups Event: पुणे हे शिक्षण आणि उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. पण गेल्या काही वर्षांत शहराने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या पुणे हे स्टार्टअप हब म्हणून ओळखलं जातं. या पार्श्वभूमीवर लो्टस बिझनेस स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘Synnovation 2026’ या स्टार्टअप आणि इनोव्हेशन सिम्पोजियमने पुण्याच्या स्टार्टअप इकोसिस्टमला नवी दिशा दिली आहे.

21 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, उद्योगतज्ज्ञ, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती एकत्र येत नवउद्योगांच्या संधी आणि आव्हानांचा आढावा घेतला. ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असलेला हा उपक्रम नवउद्योजकतेला चालना देणारा होता.

या वर्षी Synnovationचे 11वे वर्ष साजरा करण्यात आले आणि त्यात दोन प्रमुख उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘Synnovest’ आणि ‘SynnovatExpo’.

Synnovest हा स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे. निवडलेल्या पाच स्टार्टअप्सना आपल्या व्यवसाय कल्पना आणि सविस्तर बिझनेस प्लॅन सादर करण्याची संधी देण्यात आली. या सादरीकरणांना एंजेल इन्व्हेस्टर्स, प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हजेरी लावली.

या स्टार्टअप्समध्ये V4L Global Retailers, Vidcare Innovations, Karsun Inno, Cretebots Digital Constructions आणि Akshay Sansaadhan यांचा समावेश होता. प्रत्येक स्टार्टअपने आपली कल्पना, बाजारातील संधी, आणि वाढीची क्षमता प्रभावीपणे मांडली.

या सादरीकरणांनंतर 16 गुंतवणूकदारांनी या स्टार्टअप्समध्ये रस दाखवला. यावरून स्पष्ट होतं की, या प्लॅटफॉर्मवर सादर झालेल्या कल्पनांमध्ये गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली क्षमता आणि विश्वासार्हता आहे.

Synnovation 2026 Investors Startups Event
Tech Companies: इराणच्या धमकीमुळे अमेरिका टेन्शनमध्ये; ॲपल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 प्रमुख कंपन्यांवर हल्ला करणार

SynnovatExpo हा उपक्रमाचा दुसरा महत्त्वाचा भाग होता, ज्यात 26 स्टार्टअप्सनी आपले प्रॉडक्ट्स, तंत्रज्ञान आणि कल्पना सादर केल्या. कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, क्लीनटेक, मोबिलिटी आणि फिनटेकसारख्या विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनामुळे नवउद्योजकांना थेट ग्राहक, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्टार्टअप फाउंडर्सवर आधारित सर्वेक्षण. या सर्वेक्षणातून अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले. सर्वाधिक स्टार्टअप्स ‘Early Revenue Stage’मध्ये असल्याचं दिसून आलं, म्हणजे त्यांनी केवळ कल्पना मांडून थांबले नाहीत, तर बाजारात प्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

बहुतांश स्टार्टअप्समध्ये 6 ते 10 सदस्यांची टीम असल्याचंही आढळलं. यावरून स्पष्ट होतं की आजचा उद्योजक एकटा नव्हे, तर टीमसोबत काम करण्यावर भर देतं आहे.

स्टार्टअप सुरू करण्यामागील प्रमुख कारण म्हणून ‘पॅशन’ आणि ‘मार्केटमधील गॅप’ हे दोन घटक सर्वाधिक प्रभावी ठरले. म्हणजेच, आजचे उद्योजक केवळ नोकरी न मिळाल्यामुळे व्यवसाय करत नाहीत, तर नवकल्पना आणि संधी यांवर आधारित निर्णय घेत आहेत.

या प्रवासात अडचणीही कमी नाहीत. निधी मिळवणे आणि ग्राहक मिळवणे ही दोन मोठी आव्हाने असल्याचं सर्वेक्षणात स्पष्ट झालं. बहुतांश स्टार्टअप्सनी सुरुवातीला स्वतःच्या बचतीतून व्यवसाय सुरू केला आहे, यावरून सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक मिळवणं अजूनही कठीण असल्याचं दिसून येतं.

Synnovation 2026 Investors Startups Event
Import Duty: तेल संकटात सरकारचा मोठा निर्णय; 40 हून अधिक पेट्रोकेमिकल्सवरील शुल्क केले रद्द, कोणाला फायदा होणार?

या कार्यक्रमात सादर झालेल्या ‘Feasibility Study’मधून स्टार्टअप्सच्या व्यवहार्यतेचा सखोल अभ्यास करण्यात आला. 662 लोकांच्या प्रतिसादावर आधारित या अभ्यासात स्टार्टअप्सच्या कल्पना, उपाय आणि विस्तारक्षमतेचा आढावा घेण्यात आला.

अभ्यासानुसार, 83 टक्के लोकांनी स्टार्टअप्सच्या समस्या ओळखण्याच्या क्षमतेला सकारात्मक प्रतिसाद दिला. 84 टक्के लोकांनी त्यांच्या उपाययोजनांना मान्यता दिली. तर 86 टक्के लोकांनी या व्यवसायांच्या विस्तारक्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

मात्र, बिझनेस टिकण्याच्या बाबतीत काही प्रमाणात सावध दृष्टिकोन दिसून आला. 81 टक्के लोकांनी बिझनेस वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी काहींनी दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेबाबत शंका व्यक्त केली.

याचा अर्थ असा की, स्टार्टअप्सकडे चांगल्या कल्पना आणि वाढीची क्षमता आहे, पण त्यांना दीर्घकालीन वाढीसाठी अधिक स्पष्ट रणनीतीची गरज आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा एक मोठा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत झालेला बदल. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 55 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. यावरून स्पष्ट होतं की, Synnovation 2026 हा केवळ एक इव्हेंट नसून, तो भविष्यातील उद्योजक तयार करणारा एक प्रभावी प्लॅटफॉर्म ठरत आहे.

आज भारत ‘जॉब सीकर्स’पासून ‘जॉब क्रिएटर्स’कडे वाटचाल करत आहे. या प्रवासात अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये स्टार्टअप्सना मिळणारी ही चालना देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्णायक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news