Pune Swaragate Katraj Metro Tunnel: स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो कामाला वेग; टीबीएम शाफ्ट खोदकाम सुरू

भूमिगत मार्गासाठी पहिला टप्पा सुरू; कात्रजहून निगडीपर्यंत मेट्रो प्रवासाचा मार्ग मोकळा
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पुणे: स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून, टीबीएम (टनेल बोरिंग मशीन) लॉन्चिंगकरिता शाफ्ट (खड्डे) खोदण्याचे काम स्वारगेट येथे वेगाने सुरू झाले आहे. शाफ्टचे खोदकाम पूर्ण झाल्यावर लवकरच हे टीबीएम स्वारगेट येथे जमिनीखाली उतरविण्यात येणार आहे. अन्‌‍ त्याद्वारे कात्रजच्या दिशेने भूमिगत मार्गाचे खोदकाम करण्यास सुरुवात होणार आहे.

Pune Metro
Pune Municipal Low Bid Tenders Policy: कमी दराच्या निविदांमुळे दर्जावर प्रश्न; पुणे महापालिकेचे धोरण ठरवण्याचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी स्वारगेट-सिव्हील कोर्ट भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि त्याचवेळी स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युद्धपातळीवर तयारी केली जात होती.

Pune Metro
Pataleshwar Caves: पाताळेश्वर लेणीतील नंदी मंडपाची दुरुस्ती; 60 लाखांचा निधी मंजूर

अखेर या कामाने आता पहिल्या टप्यासाठी वेग घेतला असून, या मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या कामासाठी स्वारगेट येथे शाफ्टच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज मार्ग सुरू झाल्यावर पुण्यातील वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार असून, हा भुयारी मेट्रो मार्ग कधी होणार, याची पुणेकरांना उत्सुकता लागली आहे.

Pune Metro
Pune Agriculture Student: पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कारवाईची मागणी

मेट्रोने कात्रजहून थेट निगडीपर्यंत प्रवास होणार

स्वारगेट-कात्रज हा मेट्रो मार्ग पूर्णत: भूमिगत असणार आहे. पर्पल मार्गिकेतील 5.46 किमीची विस्तारित मार्गिका आहे. नियोजित सर्व भूमिगत स्थानकांचा समावेश असणार आहे. यात मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज उपनगरे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे आगामी काळात मेट्रोने थेट कात्रजहून निगडीपर्यंत प्रवास करता येणार आहे.

Pune Metro
Onion Price Crash: कांद्याचे भाव कोसळले; पुणे-अहिल्यानगरातील शेतकरी आर्थिक संकटात

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेले शाफ्टचे काम आम्ही सुरू केले आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्‌‍या आव्हानात्मक असला, तरी आधुनिक यंत्रसामग््राीच्या मदतीने आम्ही तो वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हे काम नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून पुणेकरांना लवकरच या मार्गावर मेट्रो सेवा उपलब्ध होईल.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news