

धायरी/खडकवासला: सिंहगड रस्ता परिसरात पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा 2025’ या उपक्रमांतर्गत ‘एक तास-एक साथ श्रमदान’ हा उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील आठ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यामध्ये एक हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व स्थानिक रहिवासी यांनी एकजुटीने श्रमदान केले. मोहिमेतून 2700 किलो ओला कचरा व सुमारे चार टन राडारोडा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे संयोजन सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी केले. (Latest Pune News)
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार व मंगलदास माने यांचे विशेष सहकार्य लाभले. माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, स्वच्छ बँड अँबेसेडर अविनाश निमसे, जीवित नदी फाउंडेशनच्या अश्विनी भिलारे, विविध संस्था, मनपा कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ
विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देविठ्ठलवाडी नदीपात्रात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी नागरिक व मनपा कर्मचारी.ण्याची ग्वाही दिली. या मोहिमेमुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा हटविण्यात येऊन नागरिकांमध्ये सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ झाली.
स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने जबाबदारीने पुढे आल्यास शहराचा चेहरा बदलू शकतो.
- प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त, मनपा, पुणे