पवारसाहेब ईडीच्या नोटीसला घाबरले नाहीत, तुमच्या नोटीसला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

येरवडा येथील जाहीर सभेत विद्यमान आमदारांवर जोरदार टीका
Supriya Sule News
पवारसाहेब ईडीच्या नोटीसला घाबरले नाहीत, तुमच्या नोटीसला काय घाबरणार! सुप्रिया सुळे यांचा सवालFile Photo
Published on
Updated on

Pune Politics: शरद पवारसाहेब ईडीच्या नोटीसला घाबरले नाहीत, तर तुमच्या नोटीसला काय घाबरणार? असा जाहीर सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरे यांना विचारला. वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ येरवडा येथे आयोजित जाहीर सभेत सुळे बोलत होत्या.

या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, मोहन जोशी, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, प्रकाश म्हस्के, माजी नगरसेवक हनीफ शेख, संजय भोसले, किशोर विटकर, संगीता देवकर, सुनील मलके, सागर माळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Supriya Sule News
युती सरकारमुळेच महिला मतपेढी तयार: नीलम गोर्‍हे

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे शंभर टक्के विजयी होतील. निष्क्रिय ठरलेल्या विद्यमान आमदारांना मतदार धडा शिकवतील,असा जोरदार विश्वास आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे सभागृह, लक्ष्मीनगर, येरवडा येथे खा. सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली. यावेळी परिसरात आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील सरकारने केलेली अनिर्बंध उधळपट्टी, भ्रष्टाचार, दिशाहीन कारभार, राज्याची झालेली पीछेहाट, वाचाळपणा, घसरलेली प्रचाराची पातळी आणि वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा निष्क्रियपणा यावर खा. सुळे यांनी जोरदार आसूड ओढले.

खासदार सुळे म्हणाल्या, ज्याने दोन तरुण-तरुणीची अपघातात हत्या केली, ज्याची कोट्यवधींची पोर्शे कार होती. त्याला आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पिझ्झा-बर्गर खाऊ घातला, हे वास्तव आहे. कुणाच्या दबावाखाली तुम्ही ही केस दाबताय, कोणी फोन गेला? हा आरोप अनेकांनी केला. ज्या 80 वर्षांच्या योद्ध्याने त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलात, त्याच शरद पवार यांना पोर्शे कार प्रकरणात काहीही बोललात किंवा बदनामी केलीत, तर आम्ही कोर्टात खेचू अशी नोटीस पाठवली. शरद पवार हे दिल्लीच्या तख्ताला घाबरले नाहीत, तर तुझ्या नोटीसला काय घाबरणार? असाही प्रतिसवाल सुप्रिया सुळें यांनी आमदार टिंगरे यांना विचारला.

Supriya Sule News
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प. महाराष्ट्रात दोन सभा

अंडीपिल्ली काढण्याची धमकी द्याल, तर चोख प्रत्युत्तर देऊ : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी याला संधी दिली, मी त्याला संधी दिली, असे काही जण म्हणत असतात. पक्षाने संधी दिली, असे म्हणत नाहीत. आता तर अंडीपिल्ली बाहेर काढण्याची भाषा करतात. त्याच भाषेत बोलणे योग्य नाही. पण, तुम्ही मागचे काही काढणार असाल, तर आम्हालाही तुमची काही माहिती आहे.

‘तू तू मैं मैं’ ची लढाई करणार नाही, पण ‘करारा’जबाब देऊ (चोख प्रत्युत्तर देऊ). विद्यमान आमदाराने पाच वर्षांत काय केले, हे बोलण्यात काही अर्थ नाही. आता शून्यापासून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. नवे विश्व उभारावे लागणार आहे. बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या परिसरात कोणताही अपघात झाला, तर पोलिस स्टेशनला न जाता हॉस्पिटलला जावे, असा शब्द मला द्यावा, असे आवाहन करताना विद्यमान आमदारांना लक्ष्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news