

Supriya Sule on Ladki Bahin scheme
इंदापूर: लाडक्या बहिणी बोगस तसेच अनेक ठिकाणी घोटाळे केले जात आहेत. लाडकी बहिणीमध्ये काय निकष लावून अर्ज भरले आणि काय निकषाने रद्द केले, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
रविवारी (दि. 24) या इंदापूर तालुक्याच्या दौर्यावर होत्या, त्या वेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, 4 हजार 800 कोटी रुपयांमध्ये काय-काय झालं असतं. सरसकट कर्जमाफीला याचा किती आधार मिळाला असता. (Latest Pune News)
त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने याची पारदर्शक चौकशी करावी. योजना बंद करून प्रश्न सुटत नाहीत, त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. लाडक्या बहिणी तुमच्या खरंच लाडक्या असतील तर निवडणुकीनंतर देखील तुमच्या बहिणी लाडक्या असायलाच हव्यात. बहिणीसाठी सुधारणा करणे हे सरकारचा जो भाऊ आहे, त्याचे कर्तव्य नाही का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी संघ कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावर खा. सुनेत्रा पवार यांनी कुठे जायचं आणि कुठे नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या कार्यक्रमाला मलादेखील कंगना रणावत यांनी बोलावलं होतं. त्यांना विनंती केली हा संघाचा इनरोल मेनचा कार्यक्रम आहे. सभासद नोंदीच्या कार्यक्रमाला मला कंगना रणावत यांनी बोलवलं होतं. माझे आणि कंगनाजींचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, पण विचार वेगळे असल्याचे खा. सुळे यांनी स्पष्ट केले.
हे सरकार घोषणाबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे. जे सरकार 26 लाख बहिणींना धोका देऊ शकतो तर ‘टोल क्या चीज है‘ असेदेखील त्या म्हणाल्या. राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, हे केंद्र सरकारचा डेटा सांगतो. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे त्यांचे सरकार आहे. राज्यात अतिवृष्टी झाली आहे. मुख्यमंत्री आणि केंद्राचे सहकारमंत्री अमित शहा यांची मागील आठवड्यात भेट घेतली. महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, त्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकर्याची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी खा. सुळे यांनी या वेळी