Supriya Sule: बारामतीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची पोलिस अधीक्षकांची भेट; पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी

बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरमध्ये संवेदनशील ठिकाणी चेकिंग आणि सीसीटीव्ही वाढवण्याची मागणी
Supriya Sule
Supriya SulePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बारामतीतील पेट्रोल पंपावर कोयत्याने हल्ला तसेच सुपे परिसरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेतली. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह पुणे ग्रामीण भागात पोलिस पेट्रोलिंग वाढवण्यासह संवेदनशील ठिकाणी चेकिंग, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या आणि आवश्यकतेनुसार पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली.

भेटीनंतर सुळे यांनी सांगितले, बारामती लोकसभा मतदारसंघातील ८० टक्के भाग ग्रामीण आहे. मोठ्या स्वरूपाचे काही गुन्हे घडत आहेत. मात्र, एकूण गुन्हेगारी वाढली आहे, असे म्हणता येणार नाही. पोलिस अधीक्षकांचे काम चांगले असून, मदत मागितल्यास ते सहकार्य करतात.

Supriya Sule
PMPML Bus Accident Pune: माणिकबागेत पीएमपीएल बसची दुचाकीला धडक; महिला जखमी

अलीकडील गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, अशा गुन्ह्यांकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गंभीर गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यात वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी आणि पोलच्या चोऱ्यांबाबतही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. या चोऱ्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यामागील कारणे तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Supriya Sule
PMPML Bus Accident Pune: माणिकबागेत पीएमपीएल बसची दुचाकीला धडक; महिला जखमी

ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे खा. सुळे यांनी स्पष्ट केले. संवेदनशील भागात चेकिंग, सीसीटीव्ही आणि जनजागृती वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news