PMPML Bus Accident Pune: माणिकबागेत पीएमपीएल बसची दुचाकीला धडक; महिला जखमी

चालक पोलिसांच्या ताब्यात
PMPML Bus Accident Pune
PMPML Bus Accident PunePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथे पीएमपीएल बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास कल्पतरू सोसायटीसमोर, गोयल गंगा सिग्नलजवळ घडली.

दीपाली संदीप कपूर (४९, रा. धायरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. अपघातात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

PMPML Bus Accident Pune
Pune Market Yard Traffic: मार्केट यार्डातील वाहतूक कोंडीचा शेतमालाच्या आवकेला फटका; एक लाख टनांनी घट

पोलिसांच्या माहितीनुसार, पीएमपीएल बस खडकवासला बाजूकडून स्वारगेटच्या दिशेने जात होती. त्या वेळी बसच्या पुढे असलेल्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर दुचाकी बसच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आल्याने महिला जखमी झाली.

PMPML Bus Accident Pune
Pune MPSC Students Protest : ‘भीमनवारांना हटवा, परीक्षा ऑफलाईन घ्या!’; पुण्याच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे आंदोलन

याप्रकरणी बसचालक संदीप शहाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण तसेच घटनेबाबत तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news