Supriya Sule: 'आजच्या दिवशी तुझं नसणं...', भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे भावुक; अजितदादांच्या आठवणींनी मन हेलावलं, शेअर केला व्हिडिओ

Supriya Sule Ajit Pawar Bhaubeej: खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारी भावनिक पोस्ट शेअर केली.
Supriya Sule Ajit Pawar Bhaubeej
Supriya Sule Ajit Pawar BhaubeejPudhari
Published on: 
Updated on: 

Supriya Sule Ajit Pawar Bhaubeej: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने यंदा पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येणारा पवार परिवार यंदा मात्र एकत्र दिसला नाही. कुटुंबातील काही सदस्य मुंबईत, काही जण दौऱ्यावर, तर काही सदस्य बारामतीत होते. अशातच भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टसोबत त्यांनी जुन्या दिवाळीतील आनंदाचे क्षण दाखवणारा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत पवार कुटुंबातील आनंदी क्षण पाहायला मिळत आहेत. अजितदादांसोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा देताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये काय लिहिले?

''दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली. आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात. दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील - सुप्रिया सुळे''

Supriya Sule Ajit Pawar Bhaubeej
Pune Crime : गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तिन्हेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
Supriya Sule Ajit Pawar Bhaubeej
Baramati News : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले!

सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टमधून अजितदादांच्या आठवणींनी संपूर्ण कुटुंब किती भावूक झाले आहे, याची जाणीव होते. दरवर्षी आनंदाने साजरी होणारी दिवाळी आणि भाऊबीज यंदा अजितदादांशिवाय होणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत असल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टमधून अजितदादांच्या आठवणी आजही पवार कुटुंबाच्या मनात किती खोलवर रुजल्या आहेत, याची जाणीव होते. दरवर्षी भावाच्या भेटीसाठी आतुर असणाऱ्या बहिणींना यंदा भाऊबीजेच्या दिवशी त्यांची उणीव अधिकच जाणवत आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.