

बारामती: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. याबाबत बारामतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी कोणावरही आरोप केला नाही.
मागील सहा दशकांच्या पवार यांचा राजकीय प्रवास पहा, आजवर त्यांनी कोणावर आरोप केलेले नाहीत. ते म्हणाले की, दोन व्यक्ती माझ्याकडे आले. ते म्हटले की,हे काय चाललं आहे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचे, राहुल गांधींचा त्यांना फोन आला. ते दोघे भेटले. यात आपल्याला पडायचं नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. असं म्हणून साहेबांनी विषय सोडून दिला. त्यामुळे हा आरोप नाही. ते एक ’स्टेटमेंट’ असल्याचे सुळे यांनी सांगितले. (Latest Pune News)
सुळे पुढे म्हणाल्या, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, हा डेटा आहे. हा डेटा निवडणूक आयोगही नाकारू शकत नाही. त्यात जी जी डुप्लीकेट नावे आहेत, ती मतदारयादीच्या त्या पुस्तकात आहेत.
ती कागदपत्रे राहुल गांधींनी देशासमोर आणली आहे. याचे व्हेरिफिकेशन न्यू चॅनेल ने प्रत्यक्ष जाऊन केले आहे. हे वास्तव राहुल गांधींनी समोर आणले आहे. भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो.
संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित, आणि पंतप्रधानांनाही एक मत...! त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं असेल तर.. एकाच घरात चुकीची पत्ते, आधार कार्ड हे तर चैनलने वास्तव दाखवले आहे, असेही सुळे या वेळी म्हणाल्या.
‘लाडकी बहीण योजनेचा सरसकट लाभ मिळावा’
बारामती : लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. ही पहिलीच योजना असेल जी लाडक्या बहिणीसोबत पुरुषांनादेखील पैसे देणारी ठरली. या योजनेत 4800 कोटींचा गफला या सरकारने केला, असे सुळे यांनी सांगितले.
बारामतीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आज महाराष्ट्रची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. पण त्या काळी अहिल्याबाई होळकर यांनी आर्थिक नियोजन चांगले केले होते.
शेतकर्यांना कर्जमाफी नाही लाडक्या बहिणीला पैसे नाही, मग रस्त्याला 84 हजार कोटी कुठून येतात, कशासाठी पैसे लागतात, हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला. या लाडकी बहीण योजनेमुळे घराघरात कलह सुरू झाला आहे. सरकारने सरसकट सर्व महिला पात्र होतील असे पहावे.