Sunetra Pawar: हा शेवट नाही, ही तर केवळ नव्या बारामतीची सुरुवात..; सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणी सुरू आहे. पहिल्यापासूनच महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या मोठ्या मताधिक्याकडे वाटचाल करत असताना त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar File Photo
Published on
Updated on

Sunetra Pawar Baramati bypoll result 2026

बारामती: आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी 'एक्स' वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजचा हा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केली आहे.

Sunetra Pawar
Baramati Bypoll Election: बारामतीची निवडणूक भावनिकतेची: सुनेत्रा पवार

दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची, असा विश्वासही त्यांनी बारामतीकरांना दिला आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू असून पहिल्यापासूनच महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या मोठ्या मताधिक्याकडे वाटचाल करत आहेत. मतमोजणीचा कल लक्षात घेता त्या देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम प्रस्थापित करू शकतात, अशी स्थिती आहे.

Sunetra Pawar
Assembly Elections 2026 | निवडणुकांचे बिगुल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news