

बारामती: आजवरच्या सगळ्या निवडणुका अजितदादांसोबत राहून लढवल्या गेल्या. दादा शिवाय होणारी ही निवडणूक अशी कल्पना करवत नाही. पण वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. आज पार पडत असलेली ही निवडणूक भावनिकतेची आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील शाळेमध्ये त्यांनी पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासह खासदार पार्थ पवार यांनी काटेवाडीत मतदान केले.
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आजची ही निवडणूक पूर्णतः वेगळी आहे. अशा प्रकारे पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. अजितदादांनी हयात भर बारामतीकरांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकर मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर परत मतदान करताना दिसून येत आहेत.