Sunetra Pawar: अपघातग्रस्त मुलीला ताफा थांबवून सुनेत्रा पवार यांची मदत; डॉक्टरांना उपचाराच्या सूचना

या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉक्टरांना तिच्यावर उपचार करण्यासाठी सूचना केल्या.
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on
Updated on

जळोची: गुरुवारी (दि. २३) सकाळी ८च्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा बारामती ते जळोची रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त स्कुटी व मुलगी पडली होती.

यावेळी गाड्यांचा ताफा थांबून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विचारपूस करून तिला धीर देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांच्या समवेत तिला शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये भरती करून तिच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले.

Sunetra Pawar
Hadapsar Spa Raid: स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन पीडित तरुणींची पोलिसांनी केली सुटका

या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉक्टरांना तिच्यावर उपचार करण्यासाठी सूचना केल्या. व्यस्त कार्यक्रम असताना देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दाखवलेली माणुसकी व दिवंगत अजितदादा यांच्या स्टाईलमध्ये दिलेली मदत, यामुळे तेथील सर्वजण भारावून गेले.

Sunetra Pawar
Development Policy: राज्यातील महापालिकांच्या ताब्यातील जागांचा होणार विकास; राज्य सरकारने आखले मालमत्ता विकासाचे धोरण

या मुलीचे नाव धनश्री पांडुरंग कुंभार असून, ती एफवाय बी. कॉम. या वर्गामध्ये शिकत आहे. तिच्या पायाला व गुडघ्याला मार लागलेला असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news