खडकवासला धरणात महिलेची आत्महत्या

खडकवासला धरणात महिलेची आत्महत्या

खडकवासला : गोर्‍हे खुर्द येथील आशा बापू माताळे (वय 53) यांनी खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी उघडकीस आला. आजारपणाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पु

णे-पानशेत रस्त्यावरील डीआयएटी संस्थेच्यालगत खडकवासला धरणात सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे मच्छीमारांना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक पोलिस हवालदार विलास बांबळे यांनी धरणावर धाव घेतली व स्थानिक तरुणांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला, अशी माहिती पोलिस हवालदार अजय पाटसकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news