Pudhari Majha Bappa: पर्यावरणपूरकतेला चिमुरड्यांच्या सर्जनशीलतेचा साज; विद्यार्थ्यांनी साकारले शाडू मातीचे बाप्पा

Pudhari Eco Friendly Ganesh Idol Making Workshop: स्वतःच्या हाताने बनवलेला बाप्पा अधिक जवळचा वाटतो
Eco-friendly Ganpati idols
पर्यावरणपूरकतेला चिमुरड्यांच्या सर्जनशीलतेचा साज; विद्यार्थ्यांनी साकारले शाडू मातीचे बाप्पाPudhari
Published on
Updated on

Pudhari Majha Bappa Workshop

पुणे: ‘स्वतःच्या हाताने बनवलेला बाप्पा अधिक जवळचा वाटतो’... ‘आई-बाबांनी पर्यावरणपूरक मूर्तीचे महत्त्व सांगितले होते, आज स्वत: मूर्ती साकारताना मजा आली’... अशा भावना व्यक्त करत चिमुरड्या शिल्पकारांनी आपापल्या मनातील बाप्पा साकारला. दैनिक ‘पुढारी’तर्फे आयोजित ‘माझा बाप्पा’ कार्यशाळेमध्ये पर्यावरणपूरकतेच्या उद्दिष्टाला डीईएस सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा साज चढला.

दैनिक ‘पुढारी’तर्फे ‘माझा बाप्पा : शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाला स्फूर्ती’ या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत टिळक रस्ता येथील डीईएस सेकंडरी स्कूलमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (Latest Pune News)

Eco-friendly Ganpati idols
PMP bus service: नागरिक, विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार कधी? कृष्णानगरमधील पीएमपी बससेवा पाच वर्षांपासून बंद

या कार्यशाळेला पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक सॉलिटर ग्रुप, सहप्रायोजक गोयल गंगा ग्रुप आहे. एज्युकेशन पार्टनर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, एन्व्हॉयर्मेंट पार्टनर ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि., को-पार्टनर एमआयटी डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन आहे.

कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवताना अपार आनंद व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी मूर्तीवर पारंपरिक अलंकारांचा साज चढवला, तर काहींनी साधेपणावर भर दिला.

Eco-friendly Ganpati idols
Pune Theft: सराईत घरफोड्याला अटक; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

सर्व विद्यार्थी ‘माझा बाप्पा’ साकारण्यात रममाण झाले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीची वैशिष्ट्ये, मूर्ती बनविण्याची पद्धत, सूक्ष्म कलात्मकता आणि मूर्ती विसर्जनाचे पर्यावरणपूरक मार्ग याची माहिती देण्यात आली. भारती विद्यापीठच्या ‘कॉलेज ऑफ फाईन आर्ट’च्या प्राध्यापक सुनील देशपांडे आणि त्याच्या सहकार्‍यांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

गणेशोत्सव म्हटले की प्रदूषण, नदीचे पाणी खराब होणे याची चिंता जास्त सतावते. आपल्यासोबतच आपण पुढच्या पिढीलाही हे प्रदूषण रोखून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याबद्दल प्रेरित करू शकतो. त्यासाठी ‘पुढारी’ने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. विविध शाळांमध्ये जाऊन ते उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थी शाडू माती वापरून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणेशोत्सव कायमच पर्यावरणपूरकच साजरा केला पाहिजे, हा संस्कार रुजतो आहे. हा अनोखा उपक्रम ‘पुढारी’ने आमच्या डी. ई. एस. सेकंडरी स्कूलमध्ये येऊन घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

- विजया जोशी, मुख्याध्यापिका, डीईएस सेकंडरी स्कूल

आज ‘पुढारी माझा बाप्पा’ आणि डी. ई. एस. सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणपूरक गणपती’ या कार्यशाळेचे नियोजन आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने गणपती तयार केले. पर्यावरणाबाबत नुसते बोलून न दाखवता हे कार्य लहान मुलांमार्फत करून दै. ‘पुढारी’ने जनजागृतीची सुरुवात केली आहे.

- निखिल महानंद आचार्य, कलाशिक्षक, डी. ई. एस. सेकंडरी स्कूल

कायदेशीररीत्या वीजमीटर मिळविण्यासाठीही कार्यकर्त्यांना दरवर्षी मोठी कसरत करावी लागते. मुळात जर मंडळ नोंदणीकृत आहे आणि दरवर्षी मीटरचा वापर करत असेल तर त्याला प्रत्येक वर्षी त्याच प्रक्रियेसाठी करावी लागणारी धावपळ थांबण्याची गरज आहे. महावितरणने परवानगी प्रणाली सोपी करण्याची गरज आहे. महावितरणच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे काही मंडळे बेकायदेशीररीत्या वीजजोडणी करून विजेचा वापर करतात. त्यानंतर, एखादी अघटित घटना घडल्यास मंडळाला जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे, महावितरणने कार्यकर्त्यांचे काम सोपे कसे होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत. पुणे महानगरपालिकेच्या एक खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यासह अन्य सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर द्यावा.

- विनायक घाटे, कार्याध्यक्ष, अकरा मारुती चौक मंडळ.

गणेशोत्सवात शहर, राज्यासह देशभरातून नागरिक येत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. संतांचा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर ज्याप्रकारे मोबाईल टॉयलेट ठेवण्यात येतात, तसेच दोन वेळा स्वच्छता होते, तशी मोहीम राबविण्यात यावी. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय आहे तेथे दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिक इतरत्र जातात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे दोन वेळा स्वच्छता व पावडर फवारणी करण्यात यावी. गणेशोत्सवाचे पावित्र्य राहावे, यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गणेशोत्सवात मेट्रो 24 तास चालू ठेवावी. मानाचे गणपती व श्रीमंत गणपतींवर महापालिका तसेच पोलिस प्रशासनाचे पूर्ण लक्ष केंद्रित असते. प्रशासनाने सर्वांना समान न्याय मिळेल, यादृष्टीने काम करावे.

- सचिन पवार, विश्वस्त, श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट.

शहरात जिल्ह्यासह राज्यभरातून गणेशभक्त लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासह देखावे पाहण्यासाठी येतात. प्रशासनाने खड्डेमुक्त रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, विश्रामकक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भाविक, गणेशोत्सवात मंडळ तसेच कार्यकर्त्यांची होणारी गैरसोय थांबेल. दरवर्षी शहरात पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यापार्श्वभूमीवर, महापालिका व पोलिस प्रशासनाने पार्किंगचे नियोजन होऊन वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे. मेट्रो तसेच पीएमपीच्या वेळापत्रकात बदल करून गणेशोत्सवात फेर्‍या वाढविण्यासह वेळ वाढविण्याबाबतही विचार व्हावा. वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास मोठ्या प्रमाणात भाविक शहरात येतील. स्थानिक मंडळांना आर्थिक व प्रशासकीय पाठबळ मिळाल्यास मंडळाला हातभार लावणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येतही वाढ होईल.

- अभिषेक कांबळे, विश्वस्त, समाजसुधारक हिंदुस्थानी मित्रमंडळ (ट्रस्ट).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news