Pune Theft
सराईत घरफोड्याला अटक; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई(File Photo)

Pune Theft: सराईत घरफोड्याला अटक; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

शहरातील आठ गुन्ह्यांची उकल
Published on

पुणे: पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी घरफोडी, वाहनचोरी सारखे 17 गुन्हे दाखल असलेल्या सराइताला सिंहगड रोड पोलिसांनी दिघी रोड येथून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत शहरातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच, भारती विद्यापीठ एक, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. या वेळी त्याच्याकडून 14 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  (Latest Pune News)

Pune Theft
Pune Crime: नात्यातील महिलेची छेड काढल्याने एकाचा खून; पोलिसांना माहिती देणाराच निघाला खुनी

रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय 24, रा. राधानगरी सोसायटी, दिघीरोड, भोसरी) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. दि, 20 मे रोजी सिंहगड रोड येथील आनंदनगरमधील आशिष अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली होती. त्याच अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करून तपास करत असताना आरोपीने काळ्या रंगाचे जॅकेट व काळ्या रंगाचे हेल्मेट परिधान करून रात्रीच्या वेळी पहाटे 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे आरोपी सातत्याने येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दि. 8 ऑगस्ट रोजी पोलिस अंमलदार देवा चव्हाण, राहुल आलेकर, नीलेश भोरडे, तानाजी सागर यांना बातमी मिळाली की, आनंदनगर येथील घरफोडी करणारा आरोपी दिघीतील राधानगरीमध्ये थांबला आहे. ही माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळवली.

Pune Theft
Police Extortion: फौजदार साहेब, तुमचं वागणं बरं नव्हं! कारवाईच्या धाकाने हॉटेल व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप

पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलिस अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, सारगर शेडगे, विनायक मोहिते, तानाजी सागर, संदिप कांबळे यांच्या पथकाने आरोपीला दिघीतून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या चौकशीत शहरातील आठ तर शहरासह इतर जिल्ह्यातील 17 गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून 5 लाख 71 हजारांचे सोन्याचे दागिने, रोख रकमेतून खरेदी केलेली हुंदाई कंपनीची वेन्यु कार व त्या गाडीच्या अ‍ॅक्सीसरीजसाठी त्याने 1 लाख 82 हजार रुपये खर्च केले. ती गाडी या गुन्ह्यात जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. घरफोडीसाठी वापरलेले साहित्य असा 14 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

सोनटक्के याच्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी घरफोडी चोरीचे 17 गुन्हे दाखल आहेत. त्याने पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल आहे. शहरात घरफोडी चोरीसारखे गुन्हे घडत असताना पोलिसांनी नागरिकांना सोन्या- चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू घरी न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवावे, गावी जाताना शेजारी लोकांना सांगून जावे, आपली सोसायटी सीसीटीव्हीच्या निगराणीत राहिल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news