पुणे : व्यंग्यचित्र कलेचा अभ्यासक्रम सुरू करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : व्यंग्यचित्र कलेचा अभ्यासक्रम सुरू करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विविध कला जोपासणार्‍या कलाकारांना ठरावीक काळ शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत केली जावी, अशी आग्रही भूमिका मांडून विद्यापीठांनी व्यंग्यचित्रकलेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा, त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत करू, अशी ग्वाही सांस्कृतिक, उच्च शिक्षण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जागतिक व्यंग्यचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्स कंबाईन यांच्या सहकार्याने 'पुणे आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्र महोत्सवा'ला भेट दिली. या वेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, व्यंग्यचित्रकार विश्वास सूर्यवंशी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, समाज आणि राजकारण्यांना ठिकाणावर आणण्याचे आणि चिमटे काढून अंकुश ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून व्यंग्यचित्रांना महत्त्व आहे.

शासनात असूनही माझे असे मत आहे की, कलाकारांची यादी करून त्यांच्या अर्थार्जनासाठी शासनाने सहकार्य करावे. व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून जनप्रबोधन करीत चिमटे काढून अंकुश निर्माण करणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या महोत्सवाद्वारे करण्यात येत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. कलाकाराला शाबासकीची थाप मिळणे आवश्यक असते. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विविधांगी शिक्षण दिले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योगेंद्र भगत यांनी सूत्रसंचालन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news