श्वान नसबंदीसाठी महापालिकेकडून पाच संस्थांची नियुक्ती

stray dogs
stray dogs
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच संस्थांची तीन वर्षांसाठी नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. सध्या शहरात अडीच ते तीन लाख भटकी कुत्री आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे नसबंदीच्या शस्त्रक्रियेची मोहीम राबवण्यात येते.
नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार दर निश्चित करण्यात आला आहे.

या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यात द पीपल फॉर एनव्हायरमेंट अ‍ॅनिमल, अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन, जीवरक्षा, जेनी स्मिथ अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्ट आणि यूनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी या पाच संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांना पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे प्रमाणपत्र घेणे, पालिकेने प्रमाणित केलेले अ‍ॅप वापरणे, वाहनांना जीपीएस सिस्टीम लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खर्च

नसबंदी शस्त्रक्रिया, औषधोपचार, अँटी रेबीज लसीकरण तसेच महापालिकेने निर्धारीत केलेले बेल्ट, कर्मचारी, वाहन, इंधन आदींवरील खर्च संबंधित संस्थांनी करायचा आहे. एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी 1400 रुपये दर ठरविण्यात आला असून, त्याला पकडून पुन्हा जागेवर सोडण्यासाठी 200 रुपये दर आकारता येतो. अशाप्रकारे 1600 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दराने शुल्क अदा करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news