तळेगाव स्टेशन : प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी पुन्हा दिमाखात सज्ज
तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलन असो, शेतकरी आंदोलन असो, कामगारांचे आंदोलन असो लालपरीलाच(एसटी) लक्ष केले जाते. लालपरीची तोडफोड,जाळपोळ केली जाते. तरीही लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी दिमाखात सज्ज झाली आहे . मराठा आरक्षण आंदोलनात राज्यात अनेक ठिकाणी लालपरीवर दगडफेक होवून मोडतोड करण्यात आली. यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी एसटी गाड्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पूरत्या बंद करण्यात आल्या होत्या. या सगळ्या प्रकरणानंतर लालपरी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
गाडी फोडल्यानंतर जाळपोळ केल्यानंतर गाडीतील प्रवाशांमध्ये घाबराट होते. पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था होतीच असे नाही यामुळे त्यांची गैरसोय होते.रात्र असेलतर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होते.चालक, वाहकाना तर गाडी सोडूनही जाता येत नाही. गाड्यांची तोडफोड झाली की संवेदनशील भागातील गाड्या रद्द कराव्या लागतात,यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची कमालीची गैरसोय होते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाला कमालीचा अर्थिक फटका बसतो. मोडतोड झालेल्या गाड्यांच्या दुरुस्तीचाही खर्चही करावा लागतो .प्रशासनाने या बाबत कसून चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तरच अशा घटनांना आळा बसेल.
हेही वाचा :

