SSC Extra Marks: दहावीच्या निकालात कला-क्रीडा गुणांचा मोठा वाटा; चित्रकलेतून 1.91 लाख विद्यार्थ्यांना फायदा

महाराष्ट्र राज्य मंडळाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी ठरतोय वरदान; यंदा 2.76 लाख विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण
Marks
MarksPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्यासाठी गुण देण्यास सुरुवात केल्यानंतर दर वर्षी एक लाखांहून अधिक विद्यार्थी चित्रकला या प्रकारात अतिरिक्त गुण मिळवत आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी चित्रकला एकप्रकारे वरदानच ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा देखील तब्बल एक लाख 91 हजार 31 विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी वाढीव गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे क्रीडा- कलागुणांमुळे दहावीच्या गुणपत्रिकेला चांगलाच फुगवटा आल्याचे दिसून येत आहे.

Marks
Khandala Ghat Missing Link: खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीला ‘मिसिंग लिंक’चा मोठा दिलासा

शासननिर्णयानुसार विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्यासाठी देण्यात येत असलेल्या अतिरिक्त गुणांचा लाभ यंदा 2 लाख 76 हजार 391 विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यापैकी जवळपास 1 लाख 91 हजार 31 विद्यार्थ्यांना चित्रकला या प्रकारासाठी अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रकलेसाठी अतिरिक्त गुणांची खैरातच वाटण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

Marks
Bhama Asakhed Dam Water Release: भामा आसखेड धरणातून पाणी सोडले; सिद्धेगव्हाणपर्यंत बंधारे भरले

शिक्षण विभागाने शास्त्रीय गायन, नृत्य, चित्रकला, लोककला, वादन, नाट्यकला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत 3 ते 25 च्या दरम्यान अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 2 लाख 46 हजार 602 विद्यार्थ्यांना अतिरिक्त कलागुण देण्यात आले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून, 2 लाख 76 हजार 391 विद्यार्थ्यांना अतिरिक्त कलागुण देण्यात आले आहेत. यंदा नाट्य आणि एनसीसी याच प्रकारात कमी विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Marks
Chakan Leopard In MIDC: चाकण एमआयडीसीत बिबट्याची दहशत; सॅनी हेवी व मर्सिडीज बेंझ परिसरात सलग एन्ट्री

लोककला या प्रकारात गेल्या वर्षी 29 हजार 32 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले होते. यंदा याच प्रकारात 39 हजार 866 विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण घेतले आहेत. तसेच, क्रीडा प्रकारात गेल्या वर्षी 35 हजार 417 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले होते, तर यंदा 36 हजार 345 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. यंदा सर्वाधिक अतिरिक्त गुण चित्रकला, लोककला आणि क्रीडा प्रकारासाठी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळण्यास अतिरिक्त क्रीडा-कलागुणांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Marks
Maharashtra Health Scheme: महात्मा फुले जनआरोग्य योजना वादात; खासगी व धर्मादाय रुग्णालयांचा अंमलबजावणीस विरोध

अतिरिक्त कलागुण

  • शास्त्रीय नृत्य: 1 हजार 921

  • शास्त्रीय गायन: 3 हजार 709

  • शास्त्रीय वादन: 1 हजार 995

  • लोककला: 39 हजार 866

  • नाट्य: 176

  • चित्रकला: 1 लाख 91 हजार 31

  • क्रीडा: 36 हजार 345

  • स्काऊट: 1 हजार 143

  • एनसीसी: 205

एकूण 2 लाख 76 हजार 391

...असे देण्यात येतात गुण

  • जिल्हास्तर प्रावीण्य: 03

  • विभागस्तर प्रावीण्य: 05

  • राज्यस्तर प्रावीण्य: 07

  • राष्ट्रीय स्तर प्रावीण्य: 10

  • आंतरराष्ट्रीय प्रावीण्य: 25

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news