Chakan Leopard In MIDC: चाकण एमआयडीसीत बिबट्याची दहशत; सॅनी हेवी व मर्सिडीज बेंझ परिसरात सलग एन्ट्री

औद्योगिक परिसरात बिबट्या दिसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती; वन विभागाची शोधमोहीम व पिंजरे तैनात
Chakan Leopard In MIDC
Chakan Leopard In MIDCPudhari
Published on
Updated on

चाकण: खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवारात बिबट्याचा वावर आढळल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सॅनी हेवी इंडस्ट्रीज आणि मर्सिडीज बेंझ या नामांकित कंपन्यांच्या परिसरात सलग दोन दिवस बिबट्या दिसून आल्याने कामगार व कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Chakan Leopard In MIDC
Maharashtra Health Scheme: महात्मा फुले जनआरोग्य योजना वादात; खासगी व धर्मादाय रुग्णालयांचा अंमलबजावणीस विरोध

धक्कादायक बाब म्हणजे कंपनीच्या उत्पादन विभागाजवळील आतील परिसरातही बिबट्याचा मुक्त वावर दिसून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, बिब ट्याच्या हालचाली दिसलेल्या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 7) सॅनी हेवी इंडस्ट्रीजच्या आवारात, तर शुक्रवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास मर्सिडीज बेंझ कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना दिसून आला.

Chakan Leopard In MIDC
Pune Waste Picker Students SSC Result: पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचे दहावीमध्ये घवघवीत यश; डॉक्टर-इंजिनिअर होण्याची स्वप्ने

घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पहिल्या दिवशी बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर पुन्हा त्याच परिसरात तसेच मर्सिडीज बेंझ कंपनीच्या आवारात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली. कंपनी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी वन विभागाने पुन्हा परिसराची पाहणी केली. परिसरात दोन पिंजरे लावण्यात आल्याची माहिती चाकण वन विभागाचे संतोष कंक यांनी दिली.

Chakan Leopard In MIDC
Pune Police Constable Suspension: पुण्यात पोलिस हवालदार निलंबित; पबमध्ये सापडल्याने पत्नीचा छळ उघड

चार वर्षांनंतर पुन्हा बिबट्याची एंट्री

भक्ष्याच्या शोधात जवळील डोंगराळ भागातून किंवा झाडीतून बिबट्या एमआयडीसी परिसरात शिरल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 4 वर्षांपूर्वी, 21 मार्च 2022 रोजी पहाटे मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या शिरला होता. त्यावेळी चाकण वनविभाग, बचाव पथक आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमने सुमारे 5 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद केले होते.

Chakan Leopard In MIDC
PMPML Driver Training: पीएमपीएमएल चालकांसाठी सीआयआरटी प्रशिक्षण सक्तीचे; रस्ते सुरक्षेला प्राधान्य

बिबट्या नेमका आला कुठून?

एमआयडीसी परिसरात आढळलेला बिबट्या आळंदी फाटा परिसरातील वनहद्दीतून किंवा कुरुळी-निघोजे भागातील शेती परिसरातून आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, तो नेमका कोणत्या मार्गाने कंपन्यांच्या आवारात पोहोचला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news