Maharashtra SSC Exam Paper Leak: टेलिग्रामवर पेपर फुटल्याची अफवा; विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक

दहावीच्या गणित-विज्ञान प्रश्नपत्रिकांचे आमिष दाखवून पैसे उकळले; पेपर फुटले नाहीत: राज्य मंडळ
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: एका टेलिग््रााम ग््रुापवर दहावीच्या गणित तसेच विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. हव्या असतील तर पैसे भरा, अशाप्रकारे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात पेपर दिले गेले नाहीत. त्यामुळे गणित तसेच विज्ञानाचा पेपर फुटलाच नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

Fraud
HSC paper leak: बारावीचे दोन पेपर फुटले! परीक्षेच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

डॉ. माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टेलिग््रााम ग््रुापवर 9 मार्चला सायंकाळी 5.47 वाजता विज्ञान भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा मेसेज प्रसारित करण्यात आला. यादरम्यान प्राप्त तक्रारींच्या आधारे तत्काळ त्याच दिवशी पुणे विभागीय मंडळामार्फत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर संबंधित पडताळणी करावी, या उद्देशाने 10 मार्चला विभागीय मंडळ व पोलिस विभागाकडून संबंधित ॲडमिनला 11 मार्चला होणाऱ्या विज्ञान भाग एकचा पेपर उपलब्ध करून देण्यासाठी मेसेज करून मागणी केलेली रक्कम 600 रुपये देण्यात आली.

Fraud
Maharashtra CET Exam Rules 2026: सीईटी 2026 साठी कडक नियमावली; एआय व डिजिटल कॉपीवरही कारवाई

परंतु, ग््रुाप ॲडमिनने विज्ञानाचा पेपर सुरू होईपर्यंत पेपर उपलब्ध करून दिलेला नाही. याबाबत पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे. त्यामुळे टेलिग््रााम ग््रुापवर गणित भाग - 2 व विज्ञान भाग - 1 या विषयांचा पेपर सुरू होण्यापूर्वी उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. गणित भाग-2 चा पेपर हा त्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ग््रुापवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. याचा अर्थ राज्य मंडळाचा कोणताही पेपर त्या दिवशीचा पेपर सुरू होण्यापूर्वी संबंधित ग््रुापवर उपलब्ध झालेला नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Fraud
Pune Gas Cylinder Black Marketing: गॅस सिलिंडर काळाबाजार रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट

संबंधित प्रकरणात अज्ञाताने टेलिग््रााम ग््रुाप तयार करून त्यामध्ये पेपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश सकृतदर्शनी दिसून येते. संबंधित टेलिग््रााम ग््रुापवर पेपरपूर्वी पेपर उपलब्ध करून दिला जाईल, असा मेसेज प्रसारित करण्यात येतो. परंतु, प्रत्यक्ष पेपर उपलब्ध करून न देता वैयक्तिक मेसेज करून व मागणी केलेली रक्कम भरून पेपर उपलब्ध करून घ्यावा, असे सांगण्यात येते.

Fraud
Pune Municipal Corporation Hall Renovation: पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहाचे 2.22 कोटींत नूतनीकरण

म्हणजेच, सकृत्‌‍दर्शनी केवळ आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे दिसून येते. गणित भाग-2 विषयाचा पेपर त्या दिवशी पेपर संपल्यानंतर ग््रुापवर पूर्वी दिलेल्या लिंकमध्ये उपलब्ध करून दिला आहे. यावरून बोर्डाचा गणित भाग-2 चा पेपर सुरू होण्यापूर्वी टेलिग््रााम ग््रुापवर उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. तसेही गणित भाग-1 गणित भाग-2 ची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रसारित झाल्याची कोणतीही तक्रार अद्याप या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पेपर फुटले, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news