SSC Exam Form 2025: दहावीचे परीक्षा अर्ज 15 सप्टेंबरपासून भरता येणार; 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत

माध्यमिक शाळांना युडायस प्लसमधील पेन आयडीवरून परीक्षा अर्ज भरावे लागणार आहे.
SSC Exam Form 2025
दहावीचे परीक्षा अर्ज 15 सप्टेंबरपासून भरता येणार; 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत File Photo
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि.15 सप्टेंबर पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.

माध्यमिक शाळांना युडायस प्लसमधील पेन आयडीवरून परीक्षा अर्ज भरावे लागणार आहे. माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषयक घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी आदींचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरण्यात येणार आहेत. (Latest Pune News)

SSC Exam Form 2025
Land Acquisition: भूसंपादनानंतरची जबाबदारी संस्थांचीच; सरकारचे स्पष्ट निर्देश

6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा सुरूच राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून सबमिट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीत माध्यमिक शाळांच्या लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल.

SSC Exam Form 2025
Foreign Students Admission: परदेशी विद्यार्थ्यांनाही राज्यात अभियांत्रिकी प्रवेशाची गोडी; 271 परदेशी विद्यार्थ्यांचा प्रवेश

माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सर्व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक त्या सूचना विचारात घेणे आवश्यक आहे. प्री-लिस्ट जमा करायची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे देखील राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news