

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घर खाली करण्यास माझी संमती नसतानाही विकसकाने माझे घर का तोडले? घरात असणार्या सामानाची जबाबदारी कोणी घेतली? माझे घर जसे होते तसे मला परत मिळावे, अशी मागणी अक्षता अनिल गुंजाळ यांनी या एसआरए विभाग आणि विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रारीच्या माध्यमातून केली आहे. विश्रांतवाडी परिसरातील सर्व्हे नंबर 112 मध्ये राबविल्या जाणार्या एसआरए योजनेच्या गुंजाळ या पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी त्यांचे घर खाली करण्यास संमती दिली नव्हती.
गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद होते. विकसकाच्या माणसांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून घर पाडून टाकले. घरातील कागदपत्रे आणि सर्व सामान गायब केले आहे. एसआरएच्या नियमानुसार लाभार्थीची संमतीने घर खाली करायचे असते. मात्र, विकसकाच्या माणसांनी नियमांना हरताळ फासल्याचा आरोप गुंजाळ यांनी केला आहे. पोलिस उपनिरीक्षक लहू सातपुते म्हणाले, 'गुंजाळ यांचा तक्रार अर्ज आला असून, विकसकांच्या लोकांना बोलावून घेऊन या सर्वांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणी एसआरएकडून देखील माहिती मागितली आहे.
लाभार्थी यांची राहण्याची सोय केल्यानंतरच विकसकांनी लाभार्थीकडून घर खाली करून घेतले पाहिजे. संबंधित विकसकाने तसे केले नसल्यास त्यांची चौकशी करण्याचे आदेश
दिले आहेत.– नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए
हेही वाचा