SPPU Exam Cancelled: नाशिकमध्ये राष्ट्रपतींचा दौरा; पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा रद्द!

पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना फटका; रद्द झालेल्या परीक्षा ११ नोव्हेंबरला पूर्वनियोजित वेळेनुसार होणार
SPPU
SPPUPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहिल्यानगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये आज शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) विविध अभ्यासक्रमांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती; परंतु नाशिक जिल्ह्यात राष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

SPPU
Pune Court Disturbance Case: पुणे न्यायालयातच पक्षकारांचा गोंधळ; सहा जणांना प्रत्येकी एक हजारांचा दंड!

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ ध्वजारोहण व राष्ट्रपती यांचा दौरा नाशिक व त्र्यंबक भागात असल्याने वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी कळवले आहे.

SPPU
Pune Police Constable Extortion Case: कारवाईची भीती दाखवून मोटारचालकाकडे ५ हजारांची मागणी; पोलिस शिपायाला अटक!

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आपल्या ३१ ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द केलेल्या सर्व विषयांच्या परीक्षा ११ नोव्हेंबर रोजी वेळापत्रकातील पूर्वनियोजित वेळेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे, असेदेखील डॉ. तलवारे यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षेपूर्वी एकदिवस आधी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

SPPU
Pune Sarasbaug Case: सारसबागेत कारमध्ये आढळला पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ!

सायंकाळी ५ नंतर महाविद्यालयांचे कामकाज बंद होते. आता सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे किंवा एसएमएसद्वारे पाठवावी लागेल, असे काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले. एकूणच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ यावरून दिसून येत असल्याचे प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.