Pune Railway : पुण्यातून लातूरकरांसाठी विशेष गाडी; पुणे-हरंगुळ-पुणेदरम्यान धावणार

Pune Railway : पुण्यातून लातूरकरांसाठी विशेष गाडी; पुणे-हरंगुळ-पुणेदरम्यान धावणार

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-हरंगुळ-पुणेदरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 01487) दिनांक 10 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पुण्याहून दररोज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी वाजता सुटेल आणि दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी हरंगुळला पोहोचेल.

दरम्यान, ही गाडी हडपसर, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि उस्मानाबाद येथे थांबा घेईल. तसेच, हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्रमांक01488) दिनांक 10 ते 31 ऑक्टोबरदरम्यान हरंगुळ येथून दररोज दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 9 वाजता पुण्याला पोहोचेल. दरम्यान, ही गाडी उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, केम, जेऊर, दौंड, केडगाव आणि हडपसर येथे थांबा घेईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news