Baramati Fake Gazette Land Fraud: सोमेश्वरनगरमध्ये बनावट गॅझेटद्वारे भावाची शेतजमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार

करंजे येथे महसूल नोंदीत फेरफार करून मोठ्या भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Land Scam
Land ScamPudhari
Published on
Updated on

सोमेश्वरनगर: करंजे (ता. बारामती) येथे मोठ्या भावाने बनावट प्रतिज्ञापत्र आणि शासकीय गॅझेटच्या आधारे धाकट्या भावाची शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी नामदेव एकनाथ पिलाणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Land Scam
Baramati Wanted Accused Arrest: बारामतीत थरारक पाठलागानंतर 15 गुन्ह्यांतील फरारी आरोपीला अटक

याबाबत धाकटे बंधू बापूराव उर्फ तुळशीराम एकनाथ पिलाणे (रा. लपतळवाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलाणे कुटुंबाने करंजे येथील गट क्रमांक 292 मधील 3 हेक्टर 69 आर जमीन हणुमंत एकनाथ पिलाणे आणि बापूराव पिलाणे या दोघांच्या नावाने खरेदी केली होती.

Land Scam
Morgaon Bus Stand Facilities Problem: मोरगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव; प्रवाशांचे हाल सुरूच

दरम्यान, बापूराव यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते लपतळवाडी येथे राहत होते. याचाच फायदा घेत नामदेव पिलाणे यांनी “बापूराव आणि मी एकच व्यक्ती आहे” असा बनाव रचल्याचा आरोप आहे. जानेवारी 2009 मध्ये त्यांनी बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून त्याआधारे शासकीय गॅझेट करून घेतले.

Land Scam
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर पुन्हा सुरू होणार का? विकासकामांमुळे भाविकांत संभ्रम

त्यानंतर महसूल विभागाकडे खोटा अर्ज व जबाब सादर करून सातबारावर ‌‘बापूराव‌’ऐवजी ‌‘नामदेव‌’ अशी नोंद दुरुस्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

Land Scam
Daund Illegal Doctor Arrest: दौंडमध्ये बोगस डॉक्टर अटकेत; आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी उघड

मंडल अधिकारी, तलाठ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

तक्रारीनुसार, 30 जुलै 2009 रोजी नामदेव पिलाणे यांनी बनावट गॅझेट तलाठ्यांकडे सादर केले होते. त्यावेळी अर्ज आणि जबाबाची कोणतीही पडताळणी न करता महसूल विभागाने गट क्रमांक 242 ऐवजी 292 मध्ये नाव दुरुस्तीची नोंद केली. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news