Baramati Wanted Accused Arrest: बारामतीत थरारक पाठलागानंतर 15 गुन्ह्यांतील फरारी आरोपीला अटक

नदीत उडी घेऊन उसाच्या फडात लपला तरी पोलिसांच्या शिताफीमुळे दीड तासात जेरबंद
Arrested Jail
Arrested JailPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती शहर पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करीत तब्बल 15 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलेला सराईत फरारी आरोपी शंकर ऊर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती) याला अटक केली. पोलिसांपासून सुटकेसाठी त्याने नदीतील पाण्यात उडी घेतली. तेथून तो उसाच्या फडात जाऊन लपला; परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला पकडले.

Arrested Jail
Morgaon Bus Stand Facilities Problem: मोरगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव; प्रवाशांचे हाल सुरूच

पोक्याने अनेक वर्षांपासून न्यायप्रक्रियेला सातत्याने चकवा देत पोलिस व न्यायालयीन यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. अखेर तो बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोक्याविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात आठ, बारामती तालुका पोलिस ठाण्यात सहा तर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

Arrested Jail
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर पुन्हा सुरू होणार का? विकासकामांमुळे भाविकांत संभ्रम

विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक पळ काढण्यास सुरुवात केली होती. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा तसेच वॉरंट बजाविण्यात येऊनही तो कोणत्याही सुनावणीस हजर राहत नव्हता. परिणामी, संबंधित न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

Arrested Jail
Daund Illegal Doctor Arrest: दौंडमध्ये बोगस डॉक्टर अटकेत; आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी उघड

बारामती शहर पोलिसांना रविवारी (दि. 24) सकाळी माहिती मिळाली की, तो दशक्रिया विधीसाठी मळद येथे आला आहे. पोलिस कर्मचारी उदय टापरे, गिरीश नेवसे, वैभव मदने यांनी तत्काळ पथक तयार करून मळद येथे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने चित्रपटातील थरारक दृश्यालाही मागे टाकेल अशा पद्धतीने पळ काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी सुरुवातीला त्याने उंच भिंतीवरून नदीत उडी घेतली. मात्र, बारामती शहर पोलिसांनी कोणतीही भीती न बाळगता आणि जिवाची पर्वा न करता त्याच्या मागे धाव घेतली. नदीतून पळत सुटलेला पोक्या काही वेळातच नदीकाठची भिंत चढून जवळील दाट उसाच्या फडात शिरला. उंच वाढलेले उसाचे पीक, अरुंद पायवाटा आणि पूर्ण परिसरातील शांतता, यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

Arrested Jail
Indapur Water Crisis: इंदापूरमध्ये पाणीटंचाई तीव्र; शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांवर संताप

मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेत परिसरात कसून शोध मोहीम सुरू ठेवली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या या थरारक शोध मोहिमेनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत अत्यंत शिताफीने आरोपीस पकडून ताब्यात घेतले.

अनेक वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाईत जाळ्यात अडकला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. याकामी पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, हवालदार सगुणा आवटे, उमा कोकरे यांचाही सहभाग मोलाचा राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news