Someshwar Sugar Factory Election: ‘सोमेश्वर’च्या रणधुमाळीला आज विराम; तीनही पॅनेलच्या सांगता सभा

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने प्रचाराचा शेवटचा टप्पा गाजणार
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी (दि. ९) शिगेला पोहचणार आहे. तीनही पॅनेलकडून प्रचार सांगता सभांचे आयोजन करण्यात आले असून, सोमेश्वर कारखाना परिसर तसेच करंजेपुल येथे या सभा पार पडणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने सांगता सभांकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Someshwar Sugar Factory
Raigad Road Conditions : ताम्हिणी मार्गावर औद्योगिक-पर्यटन वाहतुकीचा वाढता ताण

सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असताना प्रचारासाठी मिळालेला कालावधी कमी असल्याने उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराबरोबरच हायटेक प्रचार यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे, व्हॉट्सॲप संदेश, प्रत्यक्ष सभासदांच्या भेटीगाठी, गावनिहाय बैठका आणि प्रचार फेऱ्यांमधून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न तीनही पॅनेलकडून करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी जेवणावळी सुरू झाल्याने निवडणुकीतील प्रचाराला आणखी रंगत आली आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Sweeping Contractors: पुण्यात सफाईच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना दणका! सहा जणांना नोटीस, लाखोंचा दंड

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या प्रचाराची धुरा 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, माणिक झेंडे, सुदाम इंगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांभाळली.

कारखान्याच्या विकासाचा मुद्दा पुढे करीत या पॅनेलकडून सभासदांशी संपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला.

श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या प्रचारात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी सहभाग घेत प्रचाराची धुरा सांभाळली. पॅनेलच्या उमेदवारांसाठी गावोगावी सभा, बैठका आणि सभासदांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यात आल्या. त्यामुळे या पॅनेलचा प्रचार चांगलाच चर्चेत राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पॅनेलच्या प्रचाराची प्रमुख धुरा युवानेते युगेंद्र पवार यांनी सांभाळली. कारखान्याच्या कारभारातील विविध मुद्दे, सभासदांचे हित आणि भविष्यातील धोरणे, यावर भर देत त्यांनी सभासदांशी संवाद साधला. या पॅनेलच्या सांगता सभेला खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे उपस्थितराहणार आहेत.

गेल्या आठवडाभरात तीनही पॅनेलकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन, सभा आणि प्रत्यक्ष सभासदांच्या भेटीगाठींमुळे निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

शुक्रवारी प्रचाराचा धुराळा खाली बसल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. तीनही पॅनेलने आपापल्या विजयाचे दावे केले असले, तरी 'सोमेश्वर'चे सभासद नेमका कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतात? हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news