Someshwar Sugar Factory: सोमेश्वर साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल; 11.6 टक्के उताऱ्यासह जिल्ह्यात प्रथम

5 लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण; पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम वेगात
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

सोमेश्वरनगर: राज्यातील ऊसगाळप हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी 9.12 टक्क्यांच्या सरासरी साखर उताऱ्याने आतापर्यंत 60 लाख 84 हजार टन उसाचे गाळप करून 53 लाख 40 हजार क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन केले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शुक्रवारी (दि.26) 5 लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करत 5 लाख 56 हजार क्विंटल साखर उत्पादन केले.

Sugar
Ghod Dam Tree Cutting: घोड धरण परिसरातील वृक्षतोडीवर संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

यंदाच्या गाळप हंगामात खासगी साखर कारखाने ऊसगाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखरउतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. निरा खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती कारखान्याने साखर उताऱ्यात पाहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. सोमेश्वर कारखान्याने 11.6 चा साखरउतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Sugar
Political Party Switching: पक्षांतर आणि सत्ताकेंद्रित राजकारणामुळे जनतेचा विश्वास ढासळतोय

चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी देखील त्यांनी गाळपक्षमता वाढविली आहे. वाढवलेल्या गाळपक्षमतेमुळे चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे.

Sugar
Nira River Pollution: निरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; बारामती–फलटण परिसरातील आरोग्य व शेती धोक्यात

ऊसगाळापात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. साखरउताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. ऊसगाळपात बारामती ॲग््राो आणि दौंड शुगरने, तर साखरउताऱ्यात सोमेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची मुबलक उपलब्धता आहे. मात्र, सहकारी कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वच खासगी कारखान्यांनी स्वतःची गाळपक्षमता वाढवली असून, कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून जादा ऊसदराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील कारखाने पुणे जिल्ह्यातून ऊस नेत आहेत.

Sugar
Pune Illegal Money Lending: व्याजाची रक्कम दिल्यानंतरही फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; सावकारासह महिलेविरुद्ध गुन्हा

उतारा 11.6 टक्के

सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे ध्येय समोर ठेवून ऊसगाळपात तिसऱ्या क्रमांकावर असणार्‌‍या सोमेश्वर कारखान्याने मात्र साखरउताऱ्यात जिल्हात बाजी मारली आहे. 11.6 टक्केचा साखरउतारा ठेवत सोमेश्वर कारखाना अव्वलस्थानी आहे. 10.81 टक्क्यांचा साखरउतारा राखत छत्रपती दुसऱ्या आणि 10.81 टक्के चा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news