Ghod Dam Tree Cutting: घोड धरण परिसरातील वृक्षतोडीवर संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

काटेरी झुडपांच्या नावाखाली लिंब, चिंच, बोरसारख्या देशी झाडांची कत्तल; वन विभागाची घटनास्थळी चौकशी सुरू
Ghod Dam Tree Cutting
Ghod Dam Tree CuttingPudhari
Published on
Updated on

निमोणे: शिरूर व श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणाच्या हद्दीतील वृक्षतोडीमुळे स्थानिकाबरोबरच वृक्षप्रेमींमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे. काटेरी झाडे काढता काढता, धरण परिसराची शोभा वाढवणारे लिंब, बोर, चिंच यासारखी झाडे तोडून नक्की काय साध्य केलं हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Ghod Dam Tree Cutting
Political Party Switching: पक्षांतर आणि सत्ताकेंद्रित राजकारणामुळे जनतेचा विश्वास ढासळतोय

घोड धरणाच्या डाव्या कालव्याबरोबरच धरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणामध्ये काटेरी झाडे वाढली होती. धरण प्रशासनाने काटेरी झाडे काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनचा वापर करून काटेरी झाडे काढली. ही साफसफाई करताना धरण परिसराची शोभा वाढवणारे 30-35 वर्षांची जुनी लिंबाची व इतर देशी वाणाची झाडे भुईसपाट करण्यात आली. प्रशासनाच्या या साफसफाईने स्थानिक संशयाने पाहू लागले आहेत.

Ghod Dam Tree Cutting
Nira River Pollution: निरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; बारामती–फलटण परिसरातील आरोग्य व शेती धोक्यात

या झाडांचा धरणाला नक्की काय त्रास होता, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. धरणाच्या दगडी पिचिंगमध्ये काटेरी झाडं- झुडपं वाढली होती. ती साफ करायला कोणाचीच हरकत नव्हती. मात्र, ज्या झाडांमुळे धरण परिसराला मोठी शोभा येत होती ती झाडे तोडून नक्की काय मिळवले, अशी चर्चा या परिसरात आहे. घोड पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील देशी झाडांची कत्तल अनेकांच्या जिव्हारी लागली आहे. दरम्यान, वृक्षतोडीची वन विभागाने दखल घेतली आहे.

Ghod Dam Tree Cutting
Pune Illegal Money Lending: व्याजाची रक्कम दिल्यानंतरही फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; सावकारासह महिलेविरुद्ध गुन्हा

वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, अवजड यंत्राच्या साह्याने तोडलेल्या झाडांचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शाखा अभियंता वैभव काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घोड धरणाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा विळखा पडला होता. या झुडपांची अशाच पद्धतीने वाढ झाली असती तर पिचिंगमध्ये लावलेले दगड हे बाजूला सरकून धरणाला धोका निर्माण झाला असता.

Ghod Dam Tree Cutting
Pune POCSO Case: ख्रिसमस पार्टीच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य; ज्येष्ठ नागरिक अटकेत

हे मातीचे धरण आहे, त्यामुळे धरणाच्या मातीबंधाऱ्याला धोका होईल असे कोणतेही कृत्य प्रशासन होऊ देत नाही. डागडुजी करीत असताना काही झाडे तुटली असतील तर त्याची माहिती घेतो. धरण प्रशासनाकडून भविष्यकाळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news