’सोमेश्वर’ने केला पाच लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण

’सोमेश्वर’ने केला पाच लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण
Published on
Updated on

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच पाच लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचा टप्पा पार केला. कारखान्याने दोन महिन्यांत हा टप्पा पूर्ण केला आहे. 5 लाख 18 हजार मेट्रिक टन गाळप करीत 5 लाख 61 हजार हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उतार्‍यात 'सोमेश्वर'ने बाजी मारली असून, 10.86 साखर उतारा राखत जिल्ह्यात अग्रेसर राहिला आहे.

माळेगाव साखर कारखान्याने 57 दिवसांत 4 लाख 87 हजार मेट्रिक टन गाळप करीत 4 लाख 81 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. माळेगाव कारखान्याचा 9.95 टक्के साखर उतारा आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 2 लाख 43 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे, तर 2 लाख 36 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. ऊसतोडणी कामगारांनी नुकताच संप पुकारला होता. यातून सोमेश्वर कारखान्याने मार्ग काढत ऊसतोडणी कामगारांना मागण्या सरकारदरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात सभासदांच्या उसासह गेटकेन ऊस आणण्यावर भर दिला आहे. दररोज नऊ हजारांच्या सरासरीने कारखाना गाळप करीत आहे. सोमेश्वर कारखाना उसाचे गाळप करीत असताना कमीत कमी नुकसान, दर्जेदार साखरनिर्मिती, इतर उपपदार्थ व साखरेचा उतारा चांगला राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विस्तारीकरण झाल्याने गाळपक्षमता वाढली आहे. ट्रक ट्रॅक्टर, बैलगाडी, डंपिंग आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून वेळेत गाळप करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे.

14 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा निर्णय

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 43 हजार 501 एकर उसाची नोंद झाली होती. त्यामध्ये दुष्काळ आणि चार्‍यासाठी तुटलेल्या उसाची घट पकडून सध्या कारखान्याकडे 37 हजार 200 एकरातील सरासरी एकरी 34 च्या सरासरीने 12 लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. कारखाना चालू हंगामात 14 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामातील उसाला 3 हजार रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरपासून ऊस लागवड व खोडव्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news