High alert in Mumbai: नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट; शहरात हाय अलर्ट | पुढारी

High alert in Mumbai: नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट; शहरात हाय अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई हाय अलर्टवर आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (High alert in Mumbai)

नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान शनिवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तिचा फोन आला. त्याने शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देत, बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून, मुंबईतील पोलिस आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहे. (High alert in Mumbai)

पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की कॉलनंतर अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान नववर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे, असेही वृत्तात म्हटले आहे. (High alert in Mumbai)

हेही वाचा:

 

 

Back to top button