Electric Motor Theft: सोमेश्वर परिसरात शेतकऱ्यांची मोटर चोरी; आर्थिक तोटा वाढला

बारामतीतील निंबुत व सोमेश्वरनगर परिसरात ५ एचपीची विद्युत मोटर चोरी; पोलिस तपास सुरू, शेतकरी नाराज
Electric Motor
Electric MotorPudhari
Published on
Updated on

सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील निंबुत तसेच सोमेश्वरनगर परिसरात शेतातील विद्युत मोटर चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Electric Motor
Soldier Support: एका तासात सोडवली सैनिकाची अडचण; तहसीलदार बेडसेंची तत्परता

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी मोठ्या खर्चाने मोटर बसवतात; मात्र, सतत होत असलेल्या चोऱ्यांमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शनिवारी (दि.२२) रात्री ज्ञानेश्वर भुजंगराव काकडे यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेली ५ एचपीची मोटर चोरीला गेल्याचे सकाळी त्यांच्या मुलाच्या लक्षात आले.

Electric Motor
Manchar Election: मंचर निवडणुकीत भावकीचा रंग; उमेदवारांचा संवाद वाढला

काकडे यांनी सांगितले की, “परिसरात यापूर्वीही अशा अनेक चोऱ्या झाल्या आहेत. चोर हे स्थानिक असावेत. मोटरची किंमत किमान ३० हजार रुपये असून चोर ती कमी दरात विकत असावेत.”

Electric Motor
Sus Nande Road: सूस-नांदे रस्तारुंदीकरणास सुरुवात; वाहतूक कोंडी संपणार

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या अगोदर अशा घटनांची नोंद झाली आहे. पोलिस चोरांचा तपास करीत आहेत. चोरीची मोटर किंवा केबल कोणीही विकत घेऊ नये. आज दुसऱ्याची मोटर विकणारे उद्या आपलीच मोटर चोरी करू शकतात.

Electric Motor
Sinhagad Traffic: सिंहगड किल्ल्यावर वाहतूक बंद; पर्यायी मार्ग जाहीर

संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात सतत वाढणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news