Solar Pump Complaint: सौर कृषी पंपाच्या तक्रारी करा मोबाईलवरून

राज्यात विविध योजनांमध्ये 5 लाख 65 हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.
Solar Pump Complaint
सौर कृषी पंपाच्या तक्रारी करा मोबाईलवरून File Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यात विविध योजनांमध्ये 5 लाख 65 हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. हे सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाईल अ‍ॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणने लाभार्थी शेतकर्‍यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाईटवरून तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाईल फोनवरील महावितरणच्या अ‍ॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Latest Pune News)

Solar Pump Complaint
Jejuri Development: आगामी चार वर्षांत जेजुरीचा कायापालट; आमदार विजय शिवतारे यांचे प्रतिपादन

महावितरणचे मोबाईल अ‍ॅप लोकप्रिय ठरले आहे. वीज ग्राहक त्याचा वापर आपले वीज बिल जाणून घेणे, बिल भरणे यासह मीटर रिडिंग नोंदणी, वीज चोरी कळविणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी करत आहेत. त्याच प्रमाणे आता शेतकर्‍यांना या मोबाईल अ‍ॅपमध्ये ’सौर पंप तक्रार’ यावर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल. तक्रार नोंदविताना शेतकर्‍याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.

Solar Pump Complaint
Purandar Airport: भूसंपादनविरोधातील हरकतींवर सुनावणी पूर्ण; काही शेतकर्‍यांचा अजूनही विरोध कायम

सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनेलची नासधूस होणे, सौर ऊर्जा संच काम करत नसणे, सौर पॅनेल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील. सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे.

शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकर्‍यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news