तिसर्‍या फेरीत सहा महाविद्यालये निवडता येणार; ‘उच्च व तंत्रशिक्षण’च्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुधारित नियमावली

‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’ने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे.
Admission update
तिसर्‍या फेरीत सहा महाविद्यालये निवडता येणार; ‘उच्च व तंत्रशिक्षण’च्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुधारित नियमावली File Photo
Published on
Updated on

पुणे: उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत कॅपच्या फेर्‍या तसेच पसंतीक्रम नोंदविण्यासह काही अन्य बदल उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम, दुसर्‍या फेरीमध्ये पहिले तीन पसंतीक्रम, तिसर्‍या फेरीमध्ये पहिले सहा पसंतीक्रम नोंदवून मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’ने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये विविध नियम देण्यात आले असून, महाविद्यालयांतील प्रवेश घेण्यासंदर्भात देखील एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. (Latest Pune News)

Admission update
Coriander Price Drop: कोथिंबीर जुडीला अवघा 3 रुपये बाजारभाव; शेतकरी हवालदिल

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम, दुसर्‍या फेरीमध्ये पहिले तीन पसंतीक्रम, तिसर्‍या फेरीमध्ये पहिले सहा पसंतीक्रम या व्यतिरिक्त इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप करण्यात आले आणि जे प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर झाले असतील किंवा ज्यांनी ऑनलाईन प्रणालीवर वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती करण्यापूर्वी अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केलेली असेल, अशा उमेदवारांनी नंतरच्या फेरीकरिता नवीन विकल्प नमुना भरताना त्यांना पूर्वीच्या फेरीमध्ये वाटप झालेला विकल्प, ते त्यांच्या पसंतीक्रमाच्या यादीत नमूद करण्याची गरज नाही.

जर अशा उमेदवारांना, एकदा का एक ते सहा दरम्यान पसंती क्रमांक वाटप करण्यात आला असेल तर, त्याची आधी वाटप करण्यात आलेली जागा आपोआप रद्द होईल. जर वरच्या पसंती क्रमानुसार नवीन जागेचे वाटप झालेले नसेल तर, पूर्वीच्या फेरीमधील झालेले वाटप अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या फेरीमध्ये, अनुक्रमे त्याच्या पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमानुसार जागेचे वाटप करण्यात आले असेल तर, असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठविण्यात येईल आणि विद्यार्थी अशा प्रकारे वाटप केलेल्या जागेचा स्वीकार करेल.

जर विद्यार्थ्याने प्रवेशनिश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली नाही, किंवा प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाइन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तर, तो त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावेल आणि ती जागा, पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल.

Admission update
Khadakwasla: खडकवासला धरणसाखळी 44 टक्क्यांवर; पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा

अशा प्रकारे केलेले जागा वाटप, अशा विद्यार्थ्यांसाठी अंतिम जागा वाटप असेल जर विद्यार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या फेरीमध्ये पहिल्या तीन या सहा पसंतीक्रमांव्यतिरिक्त इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि विद्यार्थी या वाटपाने संतुष्ट असेल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसेल तर, असा विद्यार्थी लॉगीनमधून त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवू शकेल.

एकदा का विद्यार्थ्याने वाटप केलेली जागा गोठवली की तो विद्यार्थी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाईल किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी करू शकेल आणि जागा स्वीकृती शुल्काचे प्रदान ऑनलाईन पद्धतीने करील. त्यानंतर संबंधित विद्यार्थी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होईल आणि प्रवेश घेईल. अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे केलेले जागा वाटप, अंतिम वाटप असेल.

जर अशा विद्यार्थ्याने जागा स्वीकृतीच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली नाही किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तर, त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावेल आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. त्यानंतर, असा विद्यार्थी कॅपच्या पुढील फेरींमध्ये सहभागी होण्यास पात्र असणार नाही;

ज्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या फेरीमध्ये पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमाव्यतिरिक्त, इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि त्याने, अशा जागेचा स्वीकार केल्याच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी करून जागेचा स्वीकार केला असेल तर, असा विद्यार्थी अधिक चांगल्या पसंतीची जागा मिळविण्याकरिता कॅपच्या पुढील फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल तसेच ज्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या फेरीमध्ये पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमाव्यतिरिक्त, इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि त्याने अशा जागेचा स्वीकार केल्याच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर न होता किंवा ऑनलाईन प्रणालीवर जागा स्वीकृतीकरिता अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तरीही, असा विद्यार्थी कॅपच्या पुढील फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news