Coriander Price Drop: कोथिंबीर जुडीला अवघा 3 रुपये बाजारभाव; शेतकरी हवालदिल

मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात या भाजीपाल्याचे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.
Coriander Price Drop
कोथिंबीर जुडीला अवघा 3 रुपये बाजारभाव; शेतकरी हवालदिल File Photo
Published on
Updated on

दिवे: पुरंदर तालुक्यातील शेतकरी फळबागेबरोबरच कांदा, तरकारी भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन घेत असतात. मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात या भाजीपाल्याचे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

मात्र, सध्या कोथिंबिरीचे बाजारभाव कमालीचे घसरले आहेत. जुडीला अवघा 3 रुपये बाजारभाव मिळत असून, यामध्ये शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. परिणामी, कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Pune News)

Coriander Price Drop
Khadakwasla: खडकवासला धरणसाखळी 44 टक्क्यांवर; पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा

मधल्या काळात कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, सध्या बाजारात कोथिंबिरीची मोठी आवक होत असल्याने बाजारभाव गडगडले आहेत. कडक उन्हामुळे कसेबसे उत्पादन घेतले. अशातच सततच्या पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. शिवाय बाजारभाव नसल्याने चार पैसे मिळवून देणारे पीक हातचे गेले आहे.

Coriander Price Drop
Pune Crime: लग्नाच्या आमिषाने महिलेची साडेतीन कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय सायबर ठग जाळ्यात

कोडीत येथील शेतकरी अमोल बडदे यांनी 20 गुंठे क्षेत्रावर मे महिन्यात कोथिंबिरीची लागवड केली होती. त्याची सध्या काढणी सुरू आहे. मंगळवारी बडदे यांनी ढुमेवाडी (दिवे) येथील बाजारात दोन हजार जुडी विक्रीसाठी आणली होती. त्यातील फक्त थोडीफार कोथिंबीर विकली गेली, ती देखील अवघ्या तीन रुपये या भावाने. यामध्ये बडदे यांची मजुरी व वाहतूक खर्च देखील निघाला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news