Pune SIR Voter List: ‘ॲनोमली’, ‘नो लिंकज’ मतदारांच्या दारात पुन्हा बीएलओ; सुनावणीच्या नोटिसांनी धाकधूक वाढली

एसआयआरच्या प्रारूप मतदार यादीतील नोंदींची होणार पडताळणी; कागदपत्रे सादर न केल्यास नाव वगळण्याची शक्यता
Voter Verification
Voter VerificationPudhari
Published on
Updated on

पुणे: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 'ॲनोमली' आणि 'नो लिंकज' अशी नोंद झालेल्या मतदारांसाठी आता बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) पुन्हा घराघरांत जाणार आहेत. या मतदारांना सुनावणीच्या नोटिसा बजावून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याने मतदारांची धाकधूक वाढली आहे.

Voter Verification
Humid Heat Worker Productivity: दमट उष्णतेचा भारताच्या कामगारांना मोठा फटका; उत्पादकता घटण्याचा ‘टिपिंग पॉईंट’

पुणे जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद आहे. डिजिटल नोंदींच्या तपासणीनंतर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळल्या आहेत. काही मतदारांच्या नावांमध्ये किंवा तपशिलांमध्ये तफावत असल्याने त्यांचा समावेश 'ॲनोमली'मध्ये केला आहे, तर पूर्वीच्या मतदार यादीशी आवश्यक दुवा जोडता न आल्याने काही मतदार 'नो लिंकज' श्रेणीत गेले आहेत.

Voter Verification
Vadgaon Nimbalkar Robbery Gang: पत्ता विचारण्याचा बहाणा; महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले!

या वर्गीकरणाचा अर्थ संबंधित मतदाराचे नाव थेट मतदार यादीतून वगळले जाणार, असा नसल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित मतदारांनी सुनावणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सादर करून आपला दावा सिद्ध करणे गरजेचे आहे. कागदपत्रे सादर न केल्यास अथवा सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास मतदाराचे नाव वगळले जाण्याची शक्यता आहे.

Voter Verification
Sugarcane Crop Pest Attack: पावसाने दडी, उसावर तांबेरा-हुमणी-अळीचा हल्ला; ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

दरम्यान, 'ॲनोमली' किंवा 'नो लिंकज' अशी नोंद असलेल्या मतदारांनी घाबरून न जाता सुनावणीच्या वेळी आवश्यक पुरावे सादर करावेत. मतदारांनी आपले नाव प्रारूप यादीत आहे की नाही, तसेच कोणती नोंद केली आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे पात्र मतदारांचे नाव अंतिम मतदार यादीत कायम राहण्यास मदत होणार आहे.

Voter Verification
Desh Rakshanacha Dhaga: कस्तुरी क्लबचा जवानांना ‘देशरक्षणाचा धागा’; राख्या अन् पत्रांतून वीर जवानांना सलाम

प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्यक्ष नोटीस पोहोचवणे आव्हान

शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मतदार नोकरी, शिक्षण किंवा अन्य कारणांसाठी स्थलांतरित असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्यक्ष नोटीस पोहोचविणे बीएलओंसाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित निवडणूक कार्यालयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीत आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news