Humid Heat Worker Productivity: दमट उष्णतेचा भारताच्या कामगारांना मोठा फटका; उत्पादकता घटण्याचा ‘टिपिंग पॉईंट’

IITM पुण्याच्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक निष्कर्ष; उष्णता-आर्द्रतेमुळे शेती, बांधकामासह मैदानी कामांवर सर्वाधिक परिणाम
Humid Heat
Humid HeatPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: वाढते तापमान आणि त्यासोबत वाढणारी वातावरणातील आर्द्रता यामुळे भारतातील कामगारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दमट उष्णतेमुळे होणाऱ्या संभाव्य कामाच्या तासांच्या नुकसानीने आता निर्णायक वळण अर्थात ‘टिपिंग पॉईंट’ गाठल्याचे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआटीएम, पुणे) येथील शास्त्रज्ञांच्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च : ॲटमॉसफिअर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

Humid Heat
Vadgaon Nimbalkar Robbery Gang: पत्ता विचारण्याचा बहाणा; महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले!

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार १९८०च्या दशकाच्या मध्यापासून जागतिक पातळीवर तीव्र दमट उष्णतेमुळे होणारे संभाव्य उत्पादकता नुकसान झपाट्याने वाढले आहे. या वाढीत भारताचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे उष्ण होत जाणाऱ्या जगात भारत हा दमट उष्णतेच्या परिणामांचा प्रमुख जागतिक केंद्रबिंदू बनत आहे.

Humid Heat
Sugarcane Crop Pest Attack: पावसाने दडी, उसावर तांबेरा-हुमणी-अळीचा हल्ला; ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. साहा आणि डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी हा विचार मांडला आहे. या अभ्यासात पोटेन्शिअल ऑक्युपेशनल प्रोडक्टिव्हिटी (पीओपीएल) ही संकल्पना वापरण्यात आली आहे.

Humid Heat
Desh Rakshanacha Dhaga: कस्तुरी क्लबचा जवानांना ‘देशरक्षणाचा धागा’; राख्या अन् पत्रांतून वीर जवानांना सलाम

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष...

  • धोकादायक दमट उष्णतेमुळे गमावले जाणारे कामाचे तास आणि त्या भागातील कार्यरत लोकसंख्या यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संभाव्य उत्पादकता नुकसान.

  • तापमानाबरोबर आर्द्रता वाढल्यास घामाचे बाष्पीभवन कमी होते. परिणामी, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता घटते, थकवा, निर्जलीकरण वाढते आणि कामाचा वेग कमी होतो.

  • अभ्यासात ३३ अंश सेल्सिअस आणि ४५ पेक्षा जास्त असलेल्या परिस्थितींचा विशेष विचार केला आहे.

  • भारतात उष्णता आणि आर्द्रतेचा हा संयुक्त ताण गेल्या काही दशकांत वेगाने वाढला आहे.

  • शेती, बांधकाम, मासेमारी, वाहतूक, पर्यटन आणि इतर मैदानी कामांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news