Desh Rakshanacha Dhaga: कस्तुरी क्लबचा जवानांना ‘देशरक्षणाचा धागा’; राख्या अन् पत्रांतून वीर जवानांना सलाम

रक्षाबंधनानिमित्त अनोखा उपक्रम; वीरपत्नींच्या मनोगतातून जवानांच्या कुटुंबीयांचा त्याग उलगडला
Desh Rakshanacha Dhaga
Desh Rakshanacha DhagaPudhari
Published on
Updated on

पुणे: राखीचा धागा केवळ भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करणारा नाही, तर देशरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांशीही आपुलकीचे नाते जोडणारा आहे, याच भावनेतून कस्तुरी क्लबच्या सदस्यांनी जवानांसाठी राख्या आणि पत्रे पाठवत त्यांच्या शौर्याला सलाम केला. निमित्त होते रक्षाबंधनानिमित्त पुढारी कस्तुरी क्लब आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने आयोजित ‘देशरक्षणाचा धागा’ कार्यक्रमाचे. राख्यांतून बहिणीचे प्रेम, पत्रांतून शौर्याला सलाम आणि मनात जवानांप्रती कृतज्ञतेची भावना... कस्तुरींनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. वीरपत्नींच्या मनोगतातून जवानांच्या कुटुंबीयांचा त्याग समोर आला, तर कस्तुरींनी सादर केलेल्या देशभक्‍तिपर गीत-नृत्यांनी उपस्थितांच्या मनात राष्ट्रनिष्ठेची भावना जागवली.

Desh Rakshanacha Dhaga
District Water Quality: नांदेडचे पाणी सर्वाधिक दूषित; साताऱ्यातील पाणी सर्वात शुद्ध, ‘जल जीवन मिशन’च्या तपासणीत निष्कर्ष

नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमातून रक्षाबंधनाच्या सणाला देशसेवेची भावनिक जोड देण्यात आली. देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने कस्तुरी क्लबच्या सदस्यांनी राख्या आणि पत्रे तयार केली. ही राखी आणि पत्रे ‘सैनिक मित्रपरिवार’चे आनंद सराफ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. कर्नल (निवृत्त) प्रसाद मिजार यांनी सैनिकांचे जीवन, देशाच्या सुरक्षेतील त्यांचे योगदान आणि सीमेवरील कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले. वीरपत्नी अश्विनी सचिन काळंगे आणि वीरपत्नी तृप्ती ज्ञानदेव सुळे यांनी आपल्या अनुभवातून जवानांच्या कुटुंबीयांचे आयुष्य, त्याग आणि भावनिक संघर्ष उलगडला. आनंद सराफ यांनीही विचार व्यक्त केले.

Desh Rakshanacha Dhaga
Pune Tree Falling Incidents: पुण्यात पाच वर्षांत झाडे-फांद्या पडण्याच्या ५,३६३ घटना; जीवितहानीची माहितीच महापालिकेकडे नाही

कार्यक्रमाला स्वदेशी भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल प्रधान, लक्ष्मणराव आपटे प्रशालेचे प्राचार्य अजित गायकवाड, कल्याणी सराफ आदी उपस्थित होते. कस्तुरींनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी दाद मिळवली. संजीवनी उन्हाळे आणि समूहाने नृत्याविष्कार सादर केला. श्यामल मोरे आणि समूह, अनिता शिंदे आणि समूह, कामिनी मेमाणे आणि समूह, मृणाल पटवर्धन आणि समूह तसेच सुनंदा डेरे आणि समूह यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

Desh Rakshanacha Dhaga
Swargate PMPML Bus Stand: स्वारगेट पीएमपी बसस्थानक डिसेंबरअखेर प्रवाशांच्या सेवेत; अत्याधुनिक सुविधांनी होणार सज्ज

विविध भारतीय वेशभूषांमधून कस्तुरी क्लबच्या विभागप्रमुखांनी सादर केलेला रॅम्प वॉकही लक्षवेधी ठरला. श्रद्धा गायकवाड यांनी तांत्रिक सहकार्य केले. अभिनेत्री मेघना झुझम यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या वेळी डॉ. रेश्मा पुराणिक यांनी कर्करोगाविषयी माहिती देत प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणी आणि आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन केले.

Desh Rakshanacha Dhaga
Tukaram Karande Death: राष्ट्रीय खो-खोपटू तुकाराम करांडेची पुण्यात आत्महत्या; पिस्तूल प्रकरणानंतर नैराश्यात असल्याची माहिती

देशरक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कस्तुरी क्लबच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे आणि देशसेवेची भावना जागविणारे असे उपक्रम यापुढेही सुरू राहावेत.

सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

कस्तुरी क्लबच्या सदस्यांना कर्करोगाविषयी जागरूकता, प्रतिबंधात्मक काळजी आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व, याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमाला कस्तुरींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कस्तुरी क्लबसोबत यापुढेही असे चांगले उपक्रम राबविण्यास मला नक्कीच आवडेल.

डॉ. रेश्मा पुराणिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news