Sinhagad Fort Fight: सिंहगडावर पर्यटकांचा धिंगाणा; दोन गटांत तुफान हाणामारी, दगडफेकीमुळे गोंधळ, VIDEO व्हायरल

Sinhagad Fort Fight Video Viral: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सिंहगडावर मोठी गर्दी झाल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
Sinhagad Fort Fight Video Viral
Sinhagad Fort Fight Video ViralPudhari
Published on
Updated on

Sinhagad Fort Fight Video Viral: पुण्यातील ऐतिहासिक सिंहगडावर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मात्र, या गर्दीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हाणामारीदरम्यान दगडफेकही झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

15 ऑगस्टला सिंहगडावर हजारो पर्यटक आले होते. त्यामुळे गडावर आणि गडावरून खाली येणाऱ्या रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी पर्यटकांची अक्षरशः कोंडी झाली. याच गर्दीत दोन गटांमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर हा वाद मारामारीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. काहींचे कपडे फाटले असून काही जण दगड-गोटे उचलून एकमेकांवर फेकताना दिसत आहे.

या घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, नेमके किती जण जखमी झाले आणि वादाची सुरुवात कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवेली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गर्दीचा गैरफायदा घेत महिलांना त्रास दिला

सिंहगडावरील प्रचंड गर्दीचा काही टवाळखोरांकडून गैरफायदा घेतल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे. गर्दीत महिला आणि तरुणींशी असभ्य वर्तन तसेच जाणीवपूर्वक चुकीचा स्पर्श करण्याचे प्रकार घडल्याचा दावा काही पर्यटकांनी केला.

कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत गडावर आलेल्या पर्यटकांना अशा प्रकारांमुळे त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासानंतर याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.

दगडफेकीमुळे पर्यटकांमध्ये भीती

दोन गटांमधील वाद वाढल्यानंतर दगडफेक झाल्याने आजूबाजूच्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे दगडफेक झाल्याने इतर पर्यटकांनाही दुखापत झाली आहे. या घटनेनंतर सिंहगडावरील सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sinhagad Fort Fight Video Viral
501 Days FD: 501 दिवसांची FD... 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या 5 लाख गुंतवून किती रुपये मिळू शकतात?

गुटखा खाल्ल्याने पर्यटकाला 100 उठाबशांची शिक्षा

दरम्यान, सिंहगडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांकडून एका पर्यटकाला गुटखा खाल्ल्याच्या आरोपावरून 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा प्रकारही समोर आला आहे.

गडावर स्वच्छता आणि शिस्त राखणे आवश्यक असले तरी मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना सुरक्षेला आणि गर्दी नियंत्रणाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केली.

Sinhagad Fort Fight Video Viral
Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा आणि स्थलांतराचा वाद काय आहे? हिंदू महासभा विरोध का करतेय?

सिंहगडावर गर्दीचे नियोजन करणे गरजेचे

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सिंहगडावर मोठी गर्दी होणार, याचा प्रशासनाला अंदाज असणे अपेक्षित होते. त्यामुळे आधीच पुरेसा पोलीस बंदोबस्त, गर्दीचे नियोजन आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.

सिंहगडावर एका वेळी ठराविक संख्येनेच पर्यटकांना प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. गर्दी नियंत्रणासाठी वन विभाग आणि प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर पर्यटकांची सुरक्षितता, गडाची स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासन आता कोणती पावले उचलते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news