501 Days FD: 501 दिवसांची FD... 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या 5 लाख गुंतवून किती रुपये मिळू शकतात?

501 Days FD: युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या 501 दिवसांच्या FD मध्ये सामान्य ग्राहकांना 7.80 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.
501 Days FD
501 Days FDPudhari
Published on
Updated on

501 Days FD: फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. सध्या अनेक बँका वेगवेगळ्या कालावधीसाठी चांगले व्याजदर देत आहेत. विशेषतः स्मॉल फायनान्स बँका काही विशेष FD योजनांमध्ये जास्त व्याज देत आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची 501 दिवसांची अशीच एक विशेष FD योजना आहे. या FD मध्ये सामान्य ग्राहकांना 7.80 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 8.30 टक्के व्याज मिळत आहे.

501 दिवसांसाठी पैसे गुंतवावे लागतील

या FD मध्ये 501 दिवसांसाठी पैसे ठेवावे लागतात. म्हणजेच साधारण 1 वर्ष 4 महिन्यांनी FD मॅच्युअर होते. FD करताना जो व्याजदर लागू असतो, तोच दर संपूर्ण कालावधीसाठी लॉक होतो. त्यामुळे भविष्यात बँकेने व्याजदर कमी केला तरी तुमच्या FD वर ठरलेला दर कायम राहतो.

5 लाख गुंतवल्यावर किती पैसे मिळतील?

जर एखाद्या सामान्य ग्राहकाने या FD मध्ये ₹5 लाख गुंतवले आणि 7.80 टक्के व्याजदर लागू असेल, तर 501 दिवसांनंतर त्याला सुमारे ₹5.56 लाख मिळू शकतात. म्हणजेच व्याजातून अंदाजे ₹55,900 फायदा होऊ शकतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 8.30 टक्के असल्यास ₹5 लाखांची रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी अंदाजे ₹5.60 लाखांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच त्यांना सुमारे ₹60 हजार व्याज मिळू शकते.

501 Days FD
Gen Z Finance: Gen Z च्या 'त्या' एका सवयीमुळे RBIची उडाली झोप; आकडे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

FD करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

FD वर मिळणाऱ्या व्याजावर नियमानुसार कर लागू होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारी रक्कम तुमच्या कर स्लॅबवर अवलंबून असेल.

तसेच, केवळ जास्त व्याज मिळते म्हणून कोणतीही FD निवडू नये. पैसे गुंतवण्यापूर्वी बँकेची आर्थिक स्थिती, FD मुदत, मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम आणि FD विम्याची लागू असलेली मर्यादा तपासणे महत्त्वाचे आहे.

501 Days FD
EPF Withdrawal Rules 2026: PF मधून पैसे काढणार असाल तर थांबा! 3 मोठे बदल, 12 महिन्यांचा नियम; जाणून घ्या नवे EPF Rules

म्हणूनच FD करण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी नीट समजून घेऊनच निर्णय घ्यावा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

टीप: FD करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर सध्याचे व्याजदर, अटी आणि नियम तपासा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news