Silver theft Pune: तब्बल 70 किलो चांदी पळवणारा जेरबंद; उत्तर प्रदेशातून केली अटक

खडक पोलिसांची मोठी कामगिरी; 36 किलोहून अधिक चांदी जप्त
Silver theft Pune
तब्बल 70 किलो चांदी पळवणारा जेरबंदPudhari
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील गुरुवार पेठेतील तब्बल 40 वर्षे जुन्या असलेल्या सराफी पेढीवर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल 70 किलो चांदीचे दागिने चोरी केल्यानंतर खडक पोलिसांनी एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून या वेळी 36 किलो 442 ग्रॅम चांदी जप्त केली आहे. चोरी केल्यानंतर त्याने रेल्वेने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी चांदी चोरी करून नेली होती.(Latest Pune News)

Silver theft Pune
Pune Assistant Commissioners New Powers: सहाय्यक आयुक्तांना वाढीव अधिकार! पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राजेश महाराणीदिन सरोज (36, रा. माघी चैनगड, थाना महेशगंज, ता. कुंडाख जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 14 सप्टेंबर व 15 सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी तीन पोती भरून 67 लाख 60 हजार रुपये किमतीची 70 किलोहून अधिक दागिन्यांची चोरी केली. यात 62 लाखांची चांदी तर 5 लाखांच्या रोकडचा समावेश होता. ह्या चांदीनी भरलेली पोती (सिमेंटच्या गोणीच्या आकाराची) वाहून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते.

Silver theft Pune
Dussehra Gold Silver Shopping Pune: दसऱ्यानिमित्त सोने-चांदी खरेदीला उधाण; दर वाढले, तरी गर्दी दरवर्षीप्रमाणे कायम

या प्रकरणी विनोद देवीचंद परमार (41, रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. परमार यांचे 381 गुरूवार पेठ येथे माणिक ज्वेलर्स नावाच्या दुकानातून ही चांदीची चोरी झाली होती.

गुन्ह्याचे गांर्भिर्य ओळखून पोलिस ठाण्याच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास करण्यात आला. यातील संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने उत्तर प्रदेश येथे गेले असल्याचे दिसून आले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, अमंलदार कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे यांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले.

Silver theft Pune
Municipal Elections Delay: महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच? पूरस्थितीमुळे जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर?

दि. 18 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील कुंडा येथे हे पथक दाखल झाले. आरोपीचा माग करून त्यांनी राजेश सरोज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकीशीत त्यांनी त्याच्याकडील 36 किलो 442 ग््रॉम वजनाचे चांदीचे दागिने काढून दिले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक मनोजकुमार लोंढे, शर्मिला सुतार, उपनिरीक्षक स्वप्निल बनकर, पोलिस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, निलेश दिवटे, शुभम केदारी, योगेश चंदेल, मयुर काळे यांच्या पथकाने केली.

अटक केलेल्या आरोपीसह पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, खडक पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अमंलदार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news