Shravan Sabudana Bhagar Rates: श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाणा, साबुदाणा आणि भगर महागली

शेंगदाण्याच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ; साबुदाणा २ तर भगरीचे दर ३ रुपयांनी वाढले
Sago
SagoPudhari
Published on
Updated on

पुणे: श्रावणातील व्रतवैकल्ये आणि उपवासांमुळे घराघरांत साबुदाणा खिचडी, भगर आणि शेंगदाण्याच्या पदार्थांचा बेत वाढला आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात शेंगदाणा, साबुदाणा आणि भगरीची मागणी चांगलीच वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने आठवडाभरात शेंगदाणा प्रकारानुसार किलोमागे ५ ते १० रुपयांनी महागला आहे. साबुदाण्याच्या दरात किलोमागे २ रुपये, तर भगरीत ३ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Sago
Pune Fish Rates: श्रावणात मांसाहाराला ब्रेक; मासळीच्या दरात ५० टक्के घट, चिकनही स्वस्त

श्रावण महिन्यात सोमवारसह विविध व्रत-वैकल्ये आणि सणांमुळे उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. शहर आणि उपनगरांबरोबरच ग्रामीण भागातूनही खरेदी वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. मार्केट यार्डात सध्या आंध्र प्रदेशातून नवीन, तर कर्नाटकातून जुन्या शेंगदाण्याची आवक होत आहे. दररोज सुमारे १०० ते ११० टन शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे.

Sago
Pune BSNL 700 Towers: पुण्यात BSNLचा नेटवर्क बूस्टर! ७०० टॉवर्सचे अपग्रेडेशन; नेटवर्क नसतानाही चालणार सॅटेलाईट मोबाईल

उत्पादन क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे श्रावणामुळे मागणी वाढल्याने शेंगदाण्याच्या दराला तेजी मिळाली आहे. नवरात्रीपर्यंत मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. तर, साबुदाण्याची तामिळनाडूतील सेलम येथून दररोज ६० ते ७० टन आवक होत आहे. भगरीचे दर आधीपासूनच चढे असून, नाशिक जिल्ह्यातून दररोज २० ते ३० टन भगर मार्केट यार्डात दाखल होत आहे.

Sago
Pune FDA Action: पुण्यात FDAचा मोठा दणका! 16 हॉटेल्स, ऑनलाइन फूड विक्रेते आणि डेअरींचे परवाने निलंबित

घाऊक बाजारातील किलोचे भाव

  • शेंगदाणा जाडा: ११५ ते १२०

  • स्पॅनिश शेंगदाणा: १४० ते १५०

  • घुंगरू शेंगदाणा: १३० ते १४५

  • साबुदाणा नं. १: ८०

  • साबुदाणा नं. २: ७८

  • साबुदाणा नं. ३: ७६

  • वरई भगर: २०० ते २१५

  • सावा भगर: १९० ते २००

Sago
Pune University New Colleges: पुणे विद्यापीठाच्या हद्दीत १३ नवीन महाविद्यालयांना सशर्त मंजुरी; परिसरातील कॉलेजांची होणार तपासणी

श्रावण सुरू झाल्यापासून साबुदाणा आणि भगरीची मागणी वाढली आहे. शहर, उपनगरांसह ग्रामीण भागातूनही खरेदी होत आहे. नवरात्रीपर्यंत मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. दोन्हींचे भाव आधीच चढे असल्याने यापुढे मोठी दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे.

आशिष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news