Shivane cleanliness drive: स्वच्छता अभियानाद्वारे शिवणे- उत्तमनगरमध्ये सफाई

ओला व सुका कचरा केला गोळा रहिवाशांमध्ये जनजागृती
Pune News
स्वच्छता अभियानाद्वारे शिवणे- उत्तमनगरमध्ये सफाईPudhari
Published on
Updated on

वारजे: भाजप सेवा पंधरवडाअंतर्गत शिवणे-उत्तमनगरमध्ये पदाधिकारी गणेश वांजळे व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी परिसराची साफसफाई करीत सफाई कामगारांना सफाईकामाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी रूपेश घुले, उमेश सरपाटील, अभिजित धावडे, अशोक आंधळे, भगवान मोरे, किरण हगवणे, गणेश राऊत, गोरख वांजळे, भूषण वांजळे, स्वप्निल गुजर, आरोग्य निरीक्षक कौसर पटेल, राजेंद्र वैराट, जाकीर शेख, अक्षय लांडगे, आकाश शिंदे तसेच सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते. (Latest Pune News)

Pune News
‌Swachh Pune Sunder Pune: ‘स्वच्छ पुणे- सुंदर पुणे‌’ उपक्रमाद्वारे साडेसहा टन कचरा-राडारोडा संकलित

लोहगावमध्ये ‌‘स्वच्छोत्सव‌’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम

लोहगावमध्ये महापालिकेच्या ‌‘स्वच्छोत्सव‌’ उपक्रमांतर्गत ‌‘एक तास- एक साथ श्रमदान‌’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने लोहगावमध्ये स्वच्छता मोहीम राबविली.

Pune News
Pune-Nashik Highway Traffic: आळेखिंड परिसरात मोठी वाहतूक कोंडी; अवजड वाहतूक वळवल्याचा परिणाम

लोहगावमधील काळभोरवस्ती व पवारवस्ती रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील नागरिकांमध्ये कचऱ्याविषयी जनजागृती करण्यात आली. येथील कचऱ्याचे काही क्रोनिक पॉईंट स्थानिक नागरिक व महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले. या उपक्रमात अमोल पवार, नंदकुमार खांदवे, दीपक खांदवे, आशिष खांदवे, सुनील सातव, आकाश खांदवे, राजू काळभोर तसेच, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक गोपाळकृष्ण नायडू, मुकादम सुरेश उबाळे व कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी ओला व सुका असा सुमारे अडीचशे किलो कचरा गोळा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news