शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे म्हणाले, हा ऐतिहासिक निकाल असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्त्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल. या वेळी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, अंगीकृत संघटना व शिवसैनिक उपस्थित होते.