Shirur Taluka Politics: शिरूर तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ? 35 वर्षांचा ‘किंगमेकर’ भाजपच्या वाटेवर

समर्थकांच्या ‘आता निर्णय झालाय! जय श्रीराम’ पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Candidate
CandidatePudhari
Published on
Updated on

शिरूर : शिरूर तालुक्याच्या राजकारणात तब्बल 35 वर्षांपासून निर्णायक भूमिका निभावणारा एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शिरूर तालुक्याच्या राजकारणाची गणितेच यामुळे पूर्णपणे बदलणार आहेत. शिरूर तालुक्याच्या राजकारणातील मध्यवर्ती भूमिका निभावणारा हा बडा नेता कोणत्याही पक्षात असला तरी तालुक्याचे राजकारण स्वतःभोवती फिरवत राहण्यात मागील 35 वर्षांपासून यशस्वी झाला आहे.

Candidate
Pune Grand Tour 2026 traffic update: ‘पुणे ग्राँड टूर 2026’मुळे शहरातील मध्यवर्ती रस्ते 9 तास बंद

तालुक्याच्या प्रत्येक गावात स्वतःचा दबदबा असणारा हा नेता आहे. कृषी, सहकार या विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारा हा नेता पक्षांतराबद्दल स्वतः काहीही बोलत नाही. मात्र, त्यांचे समर्थक सोशल मीडियावर ‌‘आता निर्णय झालाय! जय श्रीराम‌’ अशा पद्धतीचे स्टेट्‌‍स टाकू लागल्याने येत्या एक-दोन दिवसांत काही तरी मोठे घडणार आहे, याचे संकेत मिळू लागले आहेत.

Candidate
Pudhari Rise Up women swimming competition: ‘पुढारी राईज अप’ सीझन 4 महिलांच्या जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

आजच्या घडीला तालुक्याच्या विविध राजकीय पक्षांत जे कार्यकर्ते काम करतात, त्यातील बहुतांशी याच नेत्याच्या तालमीत तयार झालेले आहेत किंवा या नेत्याबरोबर त्यांनी काम केले आहे. मतभेदामुळे हे सर्व जण वेगवेगळ्या पक्षात गेले आणि आजच्या घडीला सत्ताधारी म्हणून तालुक्याच्या राजकारणावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू लागले.

Candidate
Bharat Forge defence contract: भारत फोर्जचा संरक्षण क्षेत्रात मोठा टप्पा; लष्करासोबत 300 कोटींचे करार

मात्र, या बड्या नेत्याने खरोखरच भाजपचा रस्ता धरला, तर तालुक्याची सत्ता-समीकरणे बदलणार, सत्तेच्या मुख्य प्रवाहात या नेत्याला निर्णायक भूमिका निभावण्याची संधी मिळाली तर आजच्या घडीला जे नेते, कार्यकर्ते सत्तेच्या मुख्य प्रवाहात आहेत, त्यांच्या राजकारणाला भविष्यात नक्कीच पायबंद बसेल, अशीही चर्चा जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news