Shirur Crime: शिरूरमध्ये जुन्या भांडणातून ३३ वर्षीय युवकाचा गोळी झाडून खून; तिघांविरुद्ध गुन्हा

दुचाकीवरून जात असताना डोक्याजवळून गोळी झाडली; घटनेनंतर हवेतही फायरिंग, आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना
Shirur Murder Case
Shirur Murder CasePudhari
Published on
Updated on

शिरूर: शिरूर शहरातील लाटे आळी येथील आंबेडकरनगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून ३३ वर्षीय युवकावर दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार करून त्याचा खून केला आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळावर पोलिसांना एक जिवंत काडतूस, एक पुंगळी, तसेच लाटे आळी येथील चौकामध्ये बेग यांच्या घरासमोर एक पुंगळी सापडली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हरीश उर्फ हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३३ रा. कामाठीपुरा, ता. शिरूर, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.

Shirur Murder Case
Sinhagad Road Traffic: सिंहगड रोडवरील कोंडी फुटणार? हिंगणे ते सहकारनगर डोंगरातून बोगद्याचा प्रस्ताव

हरीश गंगावणे यांचा डोक्याजवळ गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात रोहित रवींद्र सोनवणे (वय २६ रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३), आदित्य पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, श्रीगोंदा, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur Murder Case
Saswad Sonori Road: २० लाख खर्चूनही सासवड-सोनोरी रस्त्यावरील खड्डे कायम; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी सांगितले की, मयत हरीश गंगावणे यांचे रेव्हेन्यू कॉलनी येथे असलेल्या श्रद्धा हॉटेल अँड बार येथे सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते, यामध्ये रोहित व अनिकेत यांना गंगावणे यांनी मारहाण केली होती. गुरुवारी रात्री ही लाटे आळी येथील चौकात हे दोन्ही गट समोरासमोर आले होते. त्यावेळी रोहित सोनवणे याने हरीश गंगावणे यांना अश्लील शिवी दिली होती, याचा राग आल्याने गंगावणे व रोहित, अनिकेत यांच्यात तेथे भांडण झाले.

Shirur Murder Case
Sports Teachers Maharashtra: अंशकालीन क्रीडा शिक्षकांना मोठा धक्का, पदोन्नती नाहीच; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

रोहित हा हरीश गंगावणे यांच्या मित्राचा भाचा असल्याने याबाबत आंबेडकरनगर येथे त्यांना सकाळी सव्वासहाच्या दरम्यान गंगावणे भेटले. त्यांना हा सगळा भांडणाचा प्रकार सांगितल्यानंतर हरीश गंगावणे व त्यांचा मित्र जगताप हे त्यांच्या मोटरसायकलवरून घरी निघाले. त्यावेळी रोहित सोनवणे व अनिकेत गव्हाणे त्यांच्या पाठीमागच्या बाजूला दबा धरून बसलेले होते. या दोघांच्या हातात रिव्हाॅल्व्हवर होते. रोहित याने पाठीमागून येऊन दुचाकीवर बसलेले हरीश गंगावणे यांच्या डोक्यावर जवळून गोळी मारल्याने गंगावणे जागेवर खाली पडले. त्यानंतर दोन्ही आरोपी पाठीमागच्या बाजूने पळाले. पुढे त्यांचा मित्र आदित्य पवार हा स्कुटी घेऊन थांबला होता. त्या स्कुटीवर बसून ते पळून जात असताना घटनास्थळावरून काही अंतरावर लाटे आळी चौकात बेग यांच्या घरासमोर त्यांनी आणखी एक हवेत फायर केला व आरडाओरडा करून पळून गेले.

Shirur Murder Case
Pune Police Accident Death: पोलीस ठाण्यातून बाहेर पडले, रस्ता ओलांडताना वाहनाची धडक; पुण्यात सहाय्यक फौजदाराचा मृत्यू

या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली, तर शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमने ही भेट दिली. पोलिसांनी दोन पुंगळ्या व एक जिवंत काडतूस जप्त केले असून, आरोपींच्या शोधासाठी चार पथके पाठवली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी सांगितले. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news