Sinhagad Road Traffic: सिंहगड रोडवरील कोंडी फुटणार? हिंगणे ते सहकारनगर डोंगरातून बोगद्याचा प्रस्ताव

Pune Mayor Manjusha Nagpure: महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडून प्रस्तावित मार्गाची पाहणी; रस्ता रुंदीकरण, कल्व्हर्टसह पर्यायी मार्गाचा विचार
Tunnel
TunnelPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द परिसरातून सहकारनगर-सातारा रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डोंगरातून बोगदा (टनेल) उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे.

Tunnel
Saswad Sonori Road: २० लाख खर्चूनही सासवड-सोनोरी रस्त्यावरील खड्डे कायम; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

हिंगणे-खोराडवस्ती परिसरातून प्रस्तावित असलेल्या या बोगद्याची महापौर मंजूषा नागपुरे यांनी शुक्रवारी (दि. १८) पूर्वपाहणी केली. या वेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेविका ज्योती गोसावी, महापालिका प्रकल्प अधिकारी गोजारे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tunnel
Sports Teachers Maharashtra: अंशकालीन क्रीडा शिक्षकांना मोठा धक्का, पदोन्नती नाहीच; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

सिंहगड रोड, सहकारनगर आणि तळजाई परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता नागरिकांना आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रस्तावाचा विचार करण्यात येत आहे. प्रस्तावित बोगद्यामुळे हिंगणे ते सहकारनगर तसेच तळजाई परिसरातील दळणवळण सुलभ होण्याबरोबरच प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्याची शक्यता आहे.

Tunnel
Pune Police Accident Death: पोलीस ठाण्यातून बाहेर पडले, रस्ता ओलांडताना वाहनाची धडक; पुण्यात सहाय्यक फौजदाराचा मृत्यू

महापौर नागपुरे यांनी प्रस्तावित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाची व्यवहार्यता, तांत्रिक बाबी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रकल्प राबवताना परिसरातील वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील वाढती वाहतूक यांचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Tunnel
TET Rules Review: टीईटी नियमांची केंद्राकडून व्यापक समीक्षा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेवरही विचार

दरम्यान, हिंगणे-खोराडवस्ती परिसरातील रस्ता रुंदीकरण तसेच नाल्यावर कल्व्हर्ट उभारून तो बंदिस्त करण्याच्या प्रस्तावित कामांचीही महापौरांनी पाहणी केली. पर्यायी मार्ग विकसित करण्यासह परिसरातील विद्यमान रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news