

पुणे: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बड्या नेत्यांनी त्यांच्या सोयीनुसार लढलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग््रेास (अ.प.), भाजप आणि शिंदे शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढत वर्चस्व मिळविले आहे. जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत ही इंदापूरमध्ये झाली. तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ही लढत राष्ट्रवादी काँग््रेासने अखेर जिंकली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आपापल्या नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये आपलेच वर्चस्व ठेवण्याचा नेत्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये अनेक नेत्यांना यश आले नाही. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास (अ.प.) ला अवघ्या सहा ठिकाणी नगरसेवक विजयी करता आले. तेथे शिंदे शिवसेनेचे आठ नगरसेवक विजयी झाले आणि ठाकरे शिवसेना एक, अपक्ष दोन, काँग््रेास-भाजप दोन, अशी स्थिती राहिली. या ठिकाणी शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला असून कोणत्याही पक्षाच्या नेत्याला नगरपरिषदेवर पूर्ण वर्चस्व निर्माण करता आले नाही.
भोरमध्ये नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग््रेासकडे गेल्याने आमदार शंकर मांडेकर यांची सरशी झालेली असली तरी माजी आमदार आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले संग््रााम थोपटे यांनी 16 जागा जिंकत आपले वर्चस्व राखत नगरपालिकेची सर्व सूत्रे आपल्याकडे ठेवली आहेत. जेजुरीमध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासने नगराध्यक्षपदासह 17 जागा जिंकल्या. येथे भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या असून अपक्ष एका ठिकाणी निवडून आला. तर दौंडमध्ये नगराध्यक्षपद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासला मिळाले, तरी बहुमत मात्र भाजप आघाडीने मिळविल्याने नगरपालिकेची सूत्रे भाजप आमदार राहुल कुल यांच्याकडे आली आहेत. राष्ट्रवादी कॉंग््रेास (अप)ला अवघ्या नऊ जागा मिळाल्या तर मंचरमध्ये नगराध्यक्षपद शिंदे शिवसेनेला गेले असले तरी त्यांचे फक्त तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत.
राष्ट्रवादी काँग््रेास (अप)चे आठ, शरद पवारांच्या काँग््रेासचा एक आणि अपक्ष तीन निवडून आल्याने तेथे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील आणि माजी खासदार आढळराव पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. राजगुरुनगरमध्ये मात्र नगराध्यक्षपद शिंदे शिवसेनेकडे आणि नगरसेवकांचे बहुमतही शिंदे शिवसेनेकडे गेले आहे. दहा नगरसेवक शिंदे शिवसेनेचे, राष्ट्रवादी कॉंग््रेास (अप) पाच, भाजपचे चार आणि अपक्ष दोन निवडून आले आहेत तर चाकणमध्येही नगराध्यक्षपद शिंदे शिवसेनेकडे गेले असून बहुमतही त्यांच्याकडेच आहे. तेथे 13 जागा शिंदे शिवसेनेला, 10 राष्ट्रवादीला, एक ठाकरे गटाला आणि एक अपक्ष अशी नगरसेवकांची संख्या आहे. आळंदीमध्ये नगराध्यक्षपद भाजपकडे तसेच 15 जागा मिळवत भाजपने येथे पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. शिंदे शिवसेनेला चार आणि राष्ट्रवादीला दोन नगरसेवक निवडून आणता आले. सासवडमध्ये नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय जगताप यांनी आपले वर्चस्व टिकवले आहे. त्यांनी नगराध्यक्षपदी त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी जगताप यांना निवडून आणले. तसेच भाजपचे 13 नगरसेवक विजयी करत त्यांनी सासवड नगरपालिकेत वर्चस्व मिळविले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला 9 नगरसेवक विजयी करता आले आहेत.
इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेासचा नगराध्यक्ष आणि 14 जागांवर नगरसेवक विजय झाले आहेत तर भाजपप्रणित आघाडीला येथे फक्त सहा जागा मिळाल्या आहेत. शिरूरमध्ये नगराध्यक्षपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेले असले तरी भाजपला नगरसेवकपदाच्या 11 जागा मिळाल्याने त्यांचे वर्चस्व नगापालिकेवर झाले आहे. राष्ट्रवादी कॉंगेस (अप)ला पाच राष्ट्रवादी कॉंगेस (शप) एक, अपक्ष एक अशा जागा मिळाल्या आहेत. फुरसुंगीमध्ये नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या 19 जागा राष्ट्रवादी कॉंगेस (अप) ला मिळालेल्या आहेत. भाजपला 5 आणि शिंदे शिवसेनेला 8 जागा मिळालेल्या आहेत. माळेगाव नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे असले तरी त्यांच्या घड्याळाला फक्त आठ जागा मिळालेल्या आहेत. त्यांच्याबरोबर आघाडी करून लढणाऱ्या रंजन तावरे गटाला तीन, अपक्ष पाच आणि भाजप एक अशी नगरसेवकांची संख्या आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नगराध्यक्षपद भाजपला तर राष्ट्रवादी काँग््रेासचे 17 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपला 10 आणि अपक्ष एक अशी नगरसेवकांची संख्या आहे. लोणावळ्यामध्ये नगराध्यक्षपद अजित पवारांच्या गटाला मिळालेले आहे तर त्यांचे 16 नगरसेवक निवडून आलेले आहेत. भाजपचे चार नगरसेवक, काँग््रेास तीन, अपक्ष तीन, ठाकरे शिवसेना एक अशी स्थिती आहे. वडगाव मावळमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग््रेास (अप) चा आहे तर नगरसेवकांमध्ये त्यांना 9, भाजपला 6 आणि अपक्ष 2 अशी संख्या आहे. या वेळची निवडणूक ही स्थानिक नेत्यांच्या कसोटीची निवडणूक होती, त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडी अशी न राहता प्रत्येक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार निवडणूक लढविली आणि राजकारणामध्ये आपले वर्चस्व आपल्या भागात असावे यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.